विविध स्पर्धेतून सखींना लुटला आनंद
By admin | Published: September 1, 2016 02:14 AM2016-09-01T02:14:30+5:302016-09-01T02:14:30+5:30
लोकमत सखी मंच व श्री क्षेत्र बालाजी देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सखींकरिता विविध कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सखींनी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.
शिल्पा भरडे यांनी सखींसोबत महिला सुरक्षेवर साधला संवाद
वायगाव (नि.) : लोकमत सखी मंच व श्री क्षेत्र बालाजी देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सखींकरिता विविध कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सखींनी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. तसेच महिला सुरक्षेवर त्याच तत्परतेने सखी बोलक्या झाल्या.
हा कार्यक्रम श्रीक्षेत्र बालाजी देवस्थान येथे घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुनील तळवेकर, प्रमुख पाहुणे म्हणून महिला सुरक्षा पथकाच्या निरीक्षक शिल्पा भरडे, विलास घोडखांदे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांसोबत पोलीस निरीक्षक भरडे यांनी महिला सुरक्षित आहे काय, विषयावर संवाद सांधला. महिलांना कायद्याची माहिती दिली. महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. यानंतर महिला सुरक्षीत आहे काय, या विषयावर वक्तृत्व स्पर्धा झाली. पूनम चांडक प्रथम तर रंजना काळे द्वितीय, सोनाली जैयस्वाल या तृतीय, तर अपर्णा शिंदे, प्रतिभा घोडखांदे यांनी प्रोत्साहनपर बक्षीस पटकाविले. संगीत खुर्ची स्पर्धेत ज्योती ठक्कर, शारदा पानबुडे, राधिका ठक्कर, करूणा राऊत, रूपा चांडक, कोमल पुरोहित यांनी बक्षीस पटकाविले. डब्यात बॉल टाकणे स्पर्धेत शीतल किनगावकर, स्वाती वाटमोडे, अपर्णा शिंदे, सुनंदा कठाणे, हर्षा तापडिया, टिकली लावणे स्पर्धेत शीतल किनगावकर, प्रतिभा घोडखांदे तसेच फुगा फुगवणे स्पर्धेत सोनाली जयस्वाल, उखाणे स्पर्धेत अपर्णा शिंदे, प्रतिभा घोडखांदे, शीतल जयस्वाल, शीतल कीनगावकर, रूपा चांडक, निलीमा शेंद्रे यांनी बक्षीस मिळविले. संचालन गौरव देशमुख यांनी केले. मनीषा देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.(उपक्रम प्रतिनिधी)