भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:38 PM2018-03-29T23:38:08+5:302018-03-29T23:38:08+5:30
जैन धर्माचे २४ वे तीर्र्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव शहरातील सकल जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा व भगवान महावीर रथाची शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
पुलगाव : जैन धर्माचे २४ वे तीर्र्थंकर भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव शहरातील सकल जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा व भगवान महावीर रथाची शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना दूध वाटप करण्यात आले.
सकाळी ७.३० वाजता खंडेलवाल दिगंबर जैन मंदिरातून भगवान महावीर स्वामींची प्रतिमा विराजीत सुशोभित रथयात्रा निघाली. जैन संस्कार पाठशाळेतर्फे हरित क्रांतीचा संदेश देणारे बालगोपाल, महावीर स्वामींना दंश करणारा चंद्रकौशिक नाग, महावीर स्वामींच्या कोनाला खिळ ठोकणारा गुराखी व भगवान तथा अष्ट प्रतिहार आदी दृष्य साकारलेले चित्ररथ, रथावर विराजीत इंद्र-इंद्रायणीच्या भूमिकेत रश्मी व राजेश पाटणी, श्वेतवस्त्र धारक श्रावक व केसरी वस्त्रधारक श्राविका समावेशित शोभायात्रा लक्ष वेधत होती. जैन श्रावकांद्वारे रथाचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले. शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर, ओंकार धांदे, दिनेश खेडकर, विनोद बाभुळकर यांनी, न.प. तर्फे नगराध्यक्ष शीतल गाते, उपाध्यक्ष आशिष गांधी, गटनेते राजीव जयस्वाल यांनी, श्री संकट मोचन देवस्थानतर्फे गिरीष चौधरी, सावरिया मारोठिया यांनी, भाजपतर्फे शहराध्यक्ष मंगेश झाडे, संजय गाते, नितीन बडगे, सुरेश सुखिजा, श्रवण तिवारी, मधुकर रेवतकर, देविदास डाहे यांनी रथाचे पूजन केले. सकल जैन समाजातील ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. केतुल, अतुल पडधारियातर्फे मिठाईचे पॅकेट तर श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघाने रथाचे स्वागत करून गरबा सादर केला. पासड परिवाराने शीतपेय वितरित केले. भारतीय जैन संघटनेतर्फे सुभाष झांझरी, चंद्रकांत शहाकार व पदाधिकाऱ्यांनी रुग्णांना दूध वितरित केले. सावळकर परिवारातर्फे फलाहार देण्यात आला. झांझरी परिवाराने दूध तर शहर, महिला व युवक काँग्रेसतर्फे रमेश सावरकर, रंजना पवार, पद्मा लुंकड, गोविंद दैय्या यांनी शीतपेय वाटप केले. स्थानकवासी श्रावक संघातर्फे प्रा. प्रकाशचंद श्रीश्रीमाळ, प्रफुल दर्डा, कांतीलाल लुंकड, प्रमोद लुंकड, गौतम लुंकड, मनोज सोनी, अनिल नाहटा व परिवारांनी रथाचे पूजन करून प्रसाद वितरण केले. खंडेलवाल, दिंगबर जैन मंदिर येथे महाप्रसादाने सांगता झाली.
रथयात्रेमध्ये रमेश पाटणी, किशोर बदनोरे, सुधीर बदनोरे, महावीर लुंकड, गौतम लुंकड, वसंत कुकेकर, विरेंद्र धोपाडे, पंकज श्रीश्रीमाळ, प्रभाकर शहाकार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.