आगीत १० लाख ४० हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 09:23 PM2019-05-02T21:23:17+5:302019-05-02T21:23:36+5:30
बुधवारी आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथील शेतकरी शरद विठ्ठल निखार यांच्या शेतातील गोठा जळून १० लाख रुपयाचे नुकसान झाले. तर आष्टी तालुक्यातील तळेगाव श्या.पत. येथे शेतकरी शेषराव श्रीराव यांच्या गव्हाच्या गंजीला आग लागल्याने त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले तर गुरुवारी शासकीय दुध योजनेच्या कार्यालय परिसरात आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बुधवारी आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथील शेतकरी शरद विठ्ठल निखार यांच्या शेतातील गोठा जळून १० लाख रुपयाचे नुकसान झाले. तर आष्टी तालुक्यातील तळेगाव श्या.पत. येथे शेतकरी शेषराव श्रीराव यांच्या गव्हाच्या गंजीला आग लागल्याने त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले तर गुरुवारी शासकीय दुध योजनेच्या कार्यालय परिसरात आग लागली. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी हाणी टळली.
रोहणा : नजीकच्या धनोडी बहाद्दरपूर येथील शेतकरी शरद विठ्ठलराव निखार यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली. आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी आगीत शेतीपयोगी साहित्य जळाल्याने त्यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे.
शरद निखार यांचे गावापासून सुमारे ३ किमी अंतरावर शेत आहे. शेतीपयोगी साहित्य तसेच शेतमाल ठेवण्यासाठी त्यांनी शेतातच गोठा तयार केला आहे. याच गोठ्यात घटनेच्यादिवशी शेतीपयोगी साहित्य ठेऊन होते. दुपारी धानोडी येथील प्रवासी वाहन चालविणाºया एका व्यक्तीला शेतातील गोठ्याला आग लागल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी तातडीने घटनेची माहिती शरद निखार यांना दिली. त्यांनीही तात्काळ शेत गाठले; पण तोपर्यंत आगीने गोठ्यातील संपूर्ण साहित्याला आपल्या कवेत घेत रौद्ररुप धारण केले होते. दरम्यान आर्वी येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तासभºयाच्या शर्तीच्या प्रयत्नाअंती परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
अचानक लागलेल्या या आगीत प्लास्टिकचे ७० पाईप, प्लॉस्टीकचे ५५० कॅरेट, आठ हजार बांबु तसेच गोठ्या आत ठेवलेली एक दुचाकी, रासायनिक खतांच्या पिशव्या, तारांचे बंडल, ६० स्प्रिंकलर पाईप, २० स्प्रिंकलर व टिनावर ठेवलेली ड्रीपच्या नळ्या तसेच जनावरांचा चारा जळून खाक झाल्याने शेतकºयाचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय या घटनेची नोंद आर्वी पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.
शॉर्ट सर्किटमुळे गव्हाचा ढीग जळाला
तळेगाव (श्या.पंत.) : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ढिग करून ठेवलेले गहू पीक जळून कोळसा झाले. यात शेतकºयाचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकºयाला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे. तळेगांव येथील शेतकरी शेषराव यशवंत श्रीराव यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन आगीची ठिणगी ढीग करून ठेवलेल्या गहू पिकावर पडली. दरम्यान अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण गव्हाला आपल्या कवेत घेतले. सुरूवातीला गव्हाच्या ढिगापासून १५ ते २० फुटवर लागलेल्या आगीने बघता-बघता रौद्ररुप धारण केले होते. सुमारे २० पोते गव्हाचे उत्पन्न होईल असा अंदाज शेतकºयाचा होता. मात्र, अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण गहू जळून राख झाला. त्यामुळे मोठे आर्थिक संकटच नुकसानग्रस्त शेतकºयावर ओढावले आहे. माहिती मिळताच तलाठी आर. एन. भोले यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकºयाला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.
शासकीय दूध योजना कार्यालय परिसरात आग
सेवाग्राम : येथील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र शासन दुग्ध व्यवसाय विकास विभाग कार्यालयाच्या आवारात गुरूवारी अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुपही धारण केले. दरम्यान आग लागल्याचे लक्षात येताच तेथील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याने संभाव्य धोका टळला. विशेष म्हणजे घटनेनंतर अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. परंतु, वृत्तलिहिस्तोवर अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला नव्हता.
सेवाग्राम-वर्धा मार्गावर महाराष्ट्र शासनाचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे शासकीय दुध योजना कार्यान्वित आहे. गुरूवारी नेहमी प्रमाणे काम सुरू असताना दुपारी १२ वाजताच्या सुमारास परिसरातील गवताला आग लागल्याचे तेथील काही कर्मचाºयांच्या निदर्शनास आले. यामुळे कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कर्मचाºयांनीही सदर परिस्थितीला घाबरून न जाता अग्निशमन विभागाला माहिती दिली. शिवाय एकत्र येत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. तपत्या उन्हाची तमा न बाळगता दूध योजना कार्यालयातील कर्मचाºयांनी केलेल्या प्रत्यनांना तब्बल एक तासानंतर यश आले. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली असता संबंधितांनी अग्निशमन बंब बंदोबस्तात असल्याचे सांगितल्याने कर्मचाºयांची निराशा झाली होती.
दुपारी आग लागल्याचे लक्षात येताच घटनेची महिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून अग्निशमनबंब बंदोबस्तात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कर्मचाºयांनी एकत्र येत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे कुठले नुकसान झाले नाही.
- पितांबर आरमोरकर, डेअरी व्यवस्थापक, शासकीय दूध योजना वर्धा.