समाजाच्या प्रेमातून मानवतावादी कार्याची ऊर्जा मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:28 PM2017-12-30T23:28:36+5:302017-12-30T23:28:47+5:30

आदिवासींची संस्कृती अज्ञान गरीबाची असली तरी ती उच्च संस्कृती आहे. या संस्कृतीला मोठे करण्याचे काम आम्ही करतो आहो. या मानवतेच्या कार्याला समाजाकडून मिळालेले प्रेम हिच आमच्या कामाची उर्जा ठरते, असे प्रतिपादन रमन मॅगसेसे या जागतिक पुरस्कार विजेते ....

 The love of the community gives humanitarian work the power | समाजाच्या प्रेमातून मानवतावादी कार्याची ऊर्जा मिळते

समाजाच्या प्रेमातून मानवतावादी कार्याची ऊर्जा मिळते

Next
ठळक मुद्दे प्रकाश आमटे : सोरटा येथे ‘प्रकाशपर्व’ कार्यक्रम, आमटे दाम्पत्यासह उल्लेखनीय कार्य करणाºयांचा केला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव/रोहणा : आदिवासींची संस्कृती अज्ञान गरीबाची असली तरी ती उच्च संस्कृती आहे. या संस्कृतीला मोठे करण्याचे काम आम्ही करतो आहो. या मानवतेच्या कार्याला समाजाकडून मिळालेले प्रेम हिच आमच्या कामाची उर्जा ठरते, असे प्रतिपादन रमन मॅगसेसे या जागतिक पुरस्कार विजेते तथा समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. ते सोरटा येथील प्रकाशपर्व कार्यक्रमात बोलत होते.
स्व. मंदाताई वनस्कर ग्राम विकास बहुउद्देशीय संस्थेद्वारे प्रकाशपर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. अमर काळे, जि. प. सदस्य ज्योती निकम, वैजयंती वाघ, पं. स. सदस्य अरूणा सावरकर, सरपंच अर्चना आंबेकर, गजानन निकम, पुनेश्वर वनस्कर, गजानन वनस्कर, केंद्रीय दारूगोळा भांडाराचे सुरक्षा अधिकारी वैभव वर्मा, पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, पं.स. सदस्य दिलीप अग्रवाल, राहुल चोपडा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ. आमटे पुढे म्हणाले, दुर्गम भागात आदिवासीसाठी दवाखाना, शिक्षण, रोजगारांच्या संधी, शेती व्यवसाय व विकासाची जनजागृती याबाबत ४५ वर्षापूर्वी डॉक्टर झाल्यानंतर भामरागड भागात बाबांनी आम्हाला पिकनिकसाठी नेले होते. ती पिकनिकच आमच्या जीवनाला वळण देणारी ठरली. घनदाट जंगलात जीवनातील अंधारामुळे माणूसच माणसाला भीत होते. तिथे अहोरात्र झिजून माणूस असो की रानटी श्वापद सगळ्यांना आपलसे केले. आज माणसासोबतच रानरेडा, अस्वल, बिबट, हरिण, साप या सारखे, प्राणी जेव्हा मित्रासारखे प्रेमाने राहतात हिच आमची खरी साधना ठरते असे त्यांनी सांगितले.
डॉ. मंदाकिनी आमटे यांनी ४५ वर्षांच्या काळात डॉ. प्रकाश सोबत केलेल्या आदिवासी विकासाच्या कामाचे आपणाला मनापासून समाधान आहे. आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचे यामुळे मला वाटते, असे त्यांनी सांगितले.
आ. अमर काळे यांनी डॉ. आमटे दाम्पत्यांचा गौरव करून त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घेऊन स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांचा संस्थाध्यक्ष पुनेश्वर वनस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजकाच्यावतीने व्ही. एन. गवई, मारोती विरूळकर, निलेश ढोकणे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुबोध चचाणे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान जि. प. प्राथमिक शाळा सोरटा येथील विद्यार्थ्यांनी बँड पथकासह संचालन केले. विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीत व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाला ग्रामस्थांसह शहरवासियांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला स्थानिक आमदारांसह लोकप्रतिनिधींची दांडी
या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेनुसार आ. रणजित कांबळे, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, शिक्षण सभापती जयश्री गफाट यांना बोलाविण्यात आले होते. परंतु, त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. त्यांच्या दांडीमुळे कार्यक्रमस्थळी या प्रकाराची उपस्थितात चर्चा होती.

Web Title:  The love of the community gives humanitarian work the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.