माथाडी कामगारांचे पाठबंद-कामबंद आंदोलन स्थगित
By admin | Published: November 11, 2016 01:54 AM2016-11-11T01:54:51+5:302016-11-11T01:54:51+5:30
जिल्ह्यातील शासकीय गोदामातील कामगारांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाठबंद-कामबंद आंदोलन पुकारले होते
१५ दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
वर्धा : जिल्ह्यातील शासकीय गोदामातील कामगारांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाठबंद-कामबंद आंदोलन पुकारले होते. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी सायकाळी ५ वाजाता अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी १५ दिवसांत प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याने कामगारांनी गुरूवारी आंदोलन तात्पूर्ते स्थगित करण्यात आल्याचे कळविले आहे.
शासकीय गोदामातील कामगारांच्या वेतनातून ४० टक्के रक्कमेची कपात करण्यात येत असल्याने सदर कपात तात्काळ बंद करून ती रक्कम शासनाने भरावी. तसेच कामगारांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत वेतन देण्यात यावे, या दोन मुख्य मागणीसाठी हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने गोदामामील कामागारांकरिता आंदोलन पुकारले होते.(शहर प्रतिनिधी)