स्कूटरच्या इंंजिनवर शेतकरी अभियंत्याने बनविले यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 10:23 PM2017-10-03T22:23:11+5:302017-10-03T22:23:22+5:30

आधुनिक युगात सर्वच क्षेत्रात मानवाच्या कामाची जागा यंत्रानी घेतल्याने कामाला गती झाली आहे. शेतीच्या कामातही विविध यंत्रे दिसू लागली आहेत.

 The machine made by the farmer engineer on the scooter engine | स्कूटरच्या इंंजिनवर शेतकरी अभियंत्याने बनविले यंत्र

स्कूटरच्या इंंजिनवर शेतकरी अभियंत्याने बनविले यंत्र

Next
ठळक मुद्देआंतरमशागतीसाठी ठरले बहुपयोगी

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : आधुनिक युगात सर्वच क्षेत्रात मानवाच्या कामाची जागा यंत्रानी घेतल्याने कामाला गती झाली आहे. शेतीच्या कामातही विविध यंत्रे दिसू लागली आहेत. परंतु सर्र्वच शेतकºयांना महागडे आधुनिक यंत्र परवडणारे नाहीत. त्यामुळे स्वत:च्या गरजेतून अभियंता झालेल्या अल्पभूधारक शेतकºयांच्या मुलाने स्कूटरच्या टाकाऊ इंजिनमधून डवरणी यंत्र तयार केले आहे.
वर्धमनेरी येथील उत्तम मेहरे या अल्पभूधारक शेतकºयांचा मुलगा अक्षय याने यांत्रिकी शाखेत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. पावसाळ्याच्या दिवसात डवरणीचे अत्यंत महत्त्वाचे काम बैलजोडी शिवाय करण्याचा सध्या तरी शेतकºयांकडे फारसा पर्याय उपलब्ध नाही. अक्षयचे वडील उत्तम मेहरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनाही समस्येचा फटका बसला.
वडिलांसोबत अन्य शेतकºयांचीही अडचण दूर करण्याचा निर्धार केला. त्याकरिता स्कूटर वाहनातील टाकाऊ साहित्याचा उपयोग करून त्याने डवरणी यंत्र सहा महिन्याच्या परिश्रमातून तयार केले. तांत्रिक मदतीकरिता वलगाव येथील रोंघे इंजिनिअरींग वर्क्सने सहकार्य केले. यंत्र बनविण्याकरित २५ हजार रुपयांचा खर्च आला. आॅईल मिश्रीत पेट्रोलवर यंत्र चालविता येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title:  The machine made by the farmer engineer on the scooter engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.