मदनी फाट्यावर रोखली एसटी

By admin | Published: September 18, 2016 12:55 AM2016-09-18T00:55:23+5:302016-09-18T00:55:23+5:30

मदना या गावात पोहोचण्यासाठी परिवहन महामंडळाच्या पाच बसफेऱ्या आहेत. गावात बसच्या चार फेऱ्या नियमित होतात;

Madni Phat blocking ST | मदनी फाट्यावर रोखली एसटी

मदनी फाट्यावर रोखली एसटी

Next

पालक, विद्यार्थ्यांचे आंदोलन : बस गावात येत नसल्याने पायपीट
आकोली : मदना या गावात पोहोचण्यासाठी परिवहन महामंडळाच्या पाच बसफेऱ्या आहेत. गावात बसच्या चार फेऱ्या नियमित होतात; पण शाळकरी व महाविद्यालयीन वेळेत असणारी १० वाजताची एसटी चालक हेकेखोरपणे गावात आणत नव्हता. परिणामी विद्यार्थ्यांना तीन किमी अंतर पायी चालून मदनी फाट्यावर यावे लागत होते. यामुळे संतप्त पालक विद्यार्थ्यांनी शनिवारी मदनी फाट्यावर आंदोलन करीत एसटी रोखली. नागरिकांचा संताप पाहून चालकाने प्रकरण चिघळू नये म्हणून अखेर बस मदना गावात नेली.
मदना हे गाव मदनी फाट्यापासून आत आडवळणावर आहे. इतर प्रवासी साधने नाही. गावात येण्यासाठी चार बसफेऱ्या आहे. इतर चालक गावात बसेस नियमित आणतात; पण मंगळवार, बुधवार व शनिवारी राजू दौड नामक वाहक हेकेखोरपणा करून गावात बस आणत नव्हता. यामुळे विद्यार्थ्यांना ३ किमी पायपीट करून मदनी पाटी गाठून त्याच बसने वर्धा, दिनकरनगर येथे जावे लागत होते. सदर बसची वेळ विद्यार्थ्यांना सोईची असताना चालक जाणीवपूर्वक मदना गावात बस नेत नव्हता. यामुळे पालकांत संताप होता. अखेर माळेगाव (ठेका) कडून येणारी वर्धा बस विद्यार्थी, पालकांनी मदनी फाट्यावर रोखून धरीत संताप व्यक्त केला. वाहकाने चुकीबद्दल माफी मागितली व लगेच बस मागे वळवून मदना गावात नेली. दर्शन हिंगे, पुर्वेश सकंडे, भुषण कोंडतकर, हेमा खेलकर, शितल भुरे, तेजस मानकर, दर्शन डोंगरे, प्रणाली सुरजूसे, प्रणाली गोटे, विभा पवार या विद्यार्थ्यांसह पालक तानबिन विहान, प्रकाश मसराम, महादेव आत्राम, प्रल्हाद गिरी, शोभा मानकर, शकुंतला मदनकर, रत्नमाला मदनकर यांनी आंदोलनात भाग घेतला.(वार्ताहर)

वाहकाच्या उर्मटपणाचाही आला विद्यार्थ्यांना तिटकारा
मदना गावात एसटी न घेऊन जाता फाट्यावर आलेल्या विद्यार्थ्यांशीही वाहक उर्मटपणे बोलत असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी केल्या. विद्यार्थ्यांना कंबरेत लाथ घालू का, विद्यार्थिनींना शेंबडे दार लाव अशी भाषा वाहक वापरत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले होते. सदर वाहक कुणालाही जुमानत नसून वयोवृद्धांनाही घरीही अशीच बडबड करतात, असे म्हणून त्रस्त करीत होता. विद्यार्थ्यांना शिवीगाळ करणे आणि विद्यार्थिनींना अशोभनीय बोलण्याचे प्रकार नित्याचेच झाले होते, अशा तक्रारी विद्यार्थिनींनी केल्यात. या प्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व सदर वाहकावर कार्यवाही करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

Web Title: Madni Phat blocking ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.