महाश्रमदानाचा फुंकला बिगूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:14 AM2018-04-09T01:14:42+5:302018-04-09T01:14:42+5:30
जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास झाला. आतापर्यंत सामाजिक संस्थांकडून जनजागृती झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास झाला. आतापर्यंत सामाजिक संस्थांकडून जनजागृती झाली. खडका येथे रात्री १२ वाजता कामाचा नारळ फुटला. तर सोंडी (हेटी) येथे रविवारी अधिकाºयांच्या उपस्थितीत महाश्रमदान झाले.
पाणी टंचाईवर मात करण्याकरिता सुरू झालेल्या वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील बºयाच गावात मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास श्रमदानाची कुदळ मारल्या गेली. खडका येथे रात्री वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या हस्ते नारळ फोडून काम सुरू झाले. यावेळी गावकºयांनी पहाटे पर्यंत श्रमदान करून शेतात कंटूर बांध बांधला. सोंडी (हेटी) येथे उपजिल्हाधिकारी स्मीता पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुल्हाणे यांच्या उपस्थितीत गावकºयांनी श्रमदान केले. यावेळी अधिकाºयांनीही हातात कुदळ, फावडे घेतले.
मागील आठवड्यात बुधवारी विकास भवन येथे झालेल्या सभेत शंभरावर संघटनांनी एकत्र येत पाण्याकरिता श्रमदान करण्याची शपथ घेतली होती. त्यानुसार शनिवारी रात्रीपासून या महाश्रमदानाला प्रारंभ झाला. वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात आर्वी तालुक्यातील काकडदरा गाव राज्यात अव्वल ठरले. राज्यात अव्वल ठरण्याची प्रथा यंदाही कायम राहावी म्हणून २१७ गावांतील नागरिकांनी कंबर कसली आहे. या कामाकरिता त्यांना वैद्यकीय जनजागृती मंच, पाणी फाऊंडेशनची चमू, नागपूर येथील सामाजिक संस्था यासह जिल्ह्यातील आधारवड संस्थेचे सदस्य मार्गदर्शन करीत आहे. या कामात स्पर्धेत दिलेले सर्वच नियम पाळण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.