Maharashtra Election 2019 ; २० उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 06:00 AM2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:15+5:30
हिंगणघाट मतदारसंघात भाजपच्यावतीने विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी तर अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी आमदार अशोक श्यामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात अपक्ष हेमंत इसनकर, किसन नथ्थुजी व्यापारी, अश्विन तावाडे, अनिल जवादे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर देवळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार म्हणून समीर सुरेश देशमुख यांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात शुक्रवारपर्यंत २१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. एकाच दिवशी शुक्रवारी २० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात प्रमुख उमेदवारांमध्ये वर्ध्याचे विद्यमान भाजप आमदार डॉ. पंकज भोयर, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार, माजी आमदार दादाराव केचे, अशोेक शिंदे यांचा समावेश आहे.
२७ सप्टेंबपासून नामाकंनपत्र भरण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली. यामध्ये आर्वी येथे २८ सप्टेंबर रोजी अपक्ष उमेदवार अविनाश बढिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आज शुक्रवारी भाजपच्यावतीने दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय आर्वी मतदारसंघात अपक्ष दीपक महादेवराव मडावी यांनीही अर्ज दाखल केला आहे.
वर्धा विधानसभा मतदारसंघात भाजपच्यावतीने आमदार डॉ. पंकज भोयर यांनी तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून शेखर प्रमोद शेंडे, अपक्ष उमेदवार रवींद्र नरहरी कोटंबकर, अपक्ष उमेदवार नंदकिशोर बोरकर या चार उमेदवारांनी नामांकनपत्र दाखल केले.
हिंगणघाट मतदारसंघात भाजपच्यावतीने विद्यमान आमदार समीर कुणावार यांनी तर अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी आमदार अशोक श्यामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात अपक्ष हेमंत इसनकर, किसन नथ्थुजी व्यापारी, अश्विन तावाडे, अनिल जवादे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर देवळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार म्हणून समीर सुरेश देशमुख यांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याशिवाय या मतदारसंघात अपक्ष ज्ञानेश्वर निघोट, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यांच्याशिवाय जि.प. चे माजी सदस्य दिलीप बजरंगलाल अग्रवाल, उमेश महादेवराव म्हैसकर, किरण मारोतराव पारिसे, अजय बाबाराव तिजारे, दिनेश किसना शिरभाते अशा आठ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. वर्धा येथे आमदार डॉ. पंकज भोयर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, प्रशांत बुर्ले आदी उपस्थित होते. तर काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. चारूलता टोकस, ज्येष्ठ सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख, वर्ध्याचे माजी नगराध्यक्ष इंद्रकुमार सराफ, रिपाइं नेते गोकुल पांडे उपस्थित होते.
आर्वी येथे दादाराव केचे यांनी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत माजी खासदार विजय मुडे, अॅड. अशोक धारस्कर, मोरेश्वर भांगे, राहुल ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, नीलेश देशमुख, विजय विजयकर, अनिल जोशी आदी उपस्थित होते. तसेच कुणावार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार रामदास तडस, आमदार डॉ. रामदास आंबटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, समन्वयक रविकांत बालपांडे, किशोर दिघे, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, वसंतराव आंबटकर आदी उपस्थित होते.