Maharashtra Election 2019 ; काँग्रेसने सामान्य जनतेला विकासापासून दूर लोटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 06:00 AM2019-10-19T06:00:00+5:302019-10-19T06:00:25+5:30

आर्वी येथील गांधी चौकात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी दादाराव के चे, सुधीर दिवे, विधानसभा प्रमुख विजय बाजपेयी, माजी खासदार विजय मुडे, आसावरी देशमुख, राहुल ठाकरे, संदीप काळे, विनय डोळे, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, हाजी गफार अनीस भाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Election 2019 ; Congress lured the general public away from development | Maharashtra Election 2019 ; काँग्रेसने सामान्य जनतेला विकासापासून दूर लोटले

Maharashtra Election 2019 ; काँग्रेसने सामान्य जनतेला विकासापासून दूर लोटले

googlenewsNext
ठळक मुद्देस्मृती इराणी : आर्वीतील प्रचार सभेत केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात पाच वर्षात सर्वत्र विकासाचे वातावरण तयार करण्यात भाजप उच्चस्थानी ठरले आहे. रोजगार, शेतकरी मदत व शौचालय बांधकाम या विकास कामांत आघाडी घेतली आहे. भाजपने आपल्या कतृत्वाने उत्कृष्ट ठसा उमटविला. मात्र, काँग्रेसने आपल्या ५५ वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेला विकासापासून दूल लोटण्याचेच धोरण अंगिकारले, अशी टिका केंद्रिय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली.
आर्वी येथील गांधी चौकात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी दादाराव के चे, सुधीर दिवे, विधानसभा प्रमुख विजय बाजपेयी, माजी खासदार विजय मुडे, आसावरी देशमुख, राहुल ठाकरे, संदीप काळे, विनय डोळे, जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, हाजी गफार अनीस भाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना स्मृती ईराणी म्हणाल्या, भाजप सरकारने पाच वर्षात ८ कोटी ४० लाख महिलांना गॅस सिलिंडर देऊन महिलांचा सन्मान केला. महाराष्ट्रात फडणवीस सरकारने महाराष्ट्रात प्रगती पथावर नेण्याचे काम केले. गेल्या पाच वर्षात ३ लाख लोकांना रोजगार दिला. सामान्य जनतेला शिक्षणाच्या मुलभूत सुविधा दिल्या. मुद्रालोन योजना या सर्वच पातळीवर भारतीय जनता पक्षाची भूमिका ही सामान्यहिताची ठरली आहे. यात काँग्रेस नेत्यांनी मात्र, जनतेला विकासापासून दूर ठेवून स्वहित साधण्यातच सत्तेच हित जोपासण्याच काम केल आहे. भाजपचे सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून देशहिताची भावना सर्व भारतभर पोहोचविण्याचे काम भाजपाने केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी सुधीर दिवेंसह इतर मान्यवरांनी सभेला संबोधित केले. सभेचे संचालन नंदू वैद्य यांनी केले तर आभार विजय बाजपेयी यांनी मानले. सभेला आर्वी, आष्टी, कारंजा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Congress lured the general public away from development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.