Maharashtra Election 2019 ; शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:13+5:30

कला पथकाच्या माध्यमातून मतदारांना रिझविण्यात आले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत विकासासाठी डॉ. पंकज भोयर यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले. मागील पाच वर्षांत वर्धा मतदारसंघात विकासगंगा अवतरली आहे. त्यांनी शहरासह ग्रामीण भागालाही विकासाकरिता समान न्याय दिला असल्याचे सांगून त्यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले.

Maharashtra Election 2019 ; Demonstrate propaganda with force | Maharashtra Election 2019 ; शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता

Maharashtra Election 2019 ; शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता

Next
ठळक मुद्देचार मतदारसंघांत प्रचारतोफा थंडावल्या । प्रमुखपक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनी रॅली व पदयात्रेतून केले मतदारांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात शनिवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. अखेरच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी रॅली व पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, संपूर्ण प्रचारादरम्यान चार मतदारसंघांत प्रचार शांततेत पार पडला. भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना आवाहन केले.
वर्धा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. पंकज भोयर यांनी शास्त्री चौक ते शिवाजी चौक या दरम्यान रॅली काढून शक्तीप्रदर्शन करीत मतदारांना अभिवादन केले. त्यांच्या रॅलीत उमेदवार डॉ. पंकज भोयर, खासदार रामदास तडस, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, रविकांत बालपांडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकूर, सुनीता ढवळे, शहर अध्यक्ष प्रशांत बुर्ले, भाजपाचे महामंत्री सुनील गफाट, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे, जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे आदी उपस्थित होते.
यावेळी कला पथकाच्या माध्यमातून मतदारांना रिझविण्यात आले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत विकासासाठी डॉ. पंकज भोयर यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले. मागील पाच वर्षांत वर्धा मतदारसंघात विकासगंगा अवतरली आहे. त्यांनी शहरासह ग्रामीण भागालाही विकासाकरिता समान न्याय दिला असल्याचे सांगून त्यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले. या सभेला शिवसेनेचे जिल्हा संघटक रविकांत बालपांडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सभेत वर्धा नगरपालिकेचे नगरसेवक, सेलू नगरपंचायतीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वर्धा व सेलू तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
अखेरच्या दिवशी हिंगणघाट मतदारसंघात समुद्रपूर येथे भाजपचे उमेदवार समीर कुणावार यांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. तर राकाँ उमेदवार राजू तिमांडे यांनी हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी (रेल्वे) शहरात रॅली काढली. आर्वी मतदारसंघात आष्टी (शहीद) येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ नितीन गडकरी यांनी सभा घेतली. काँग्रेस पक्षाच्यावतीनेही रॅलीच्या माध्यमातून आर्वी मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करण्यात आले. वर्धा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांनी सेलू येथे रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. याशिवाय शहरात अपक्ष उमेदवारांनीही रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. देवळी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारासह अपक्ष उमेदवार दिलीप अग्रवाल यांनीही मतदार संघातील विविध भागात रॅली व पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले. देवळी येथे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश बकाने यांनी शक्ती प्रदर्शन केले. सर्व पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांच्या रॅली ठिकठिकानाहून निघाल्याने त्यांच्या शिस्तबद्धता दिसून आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीदरम्यान काही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
 

Web Title: Maharashtra Election 2019 ; Demonstrate propaganda with force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा