Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात ६७ नामांकनपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:17+5:30
वर्धा मतदार संघात एकूण १४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, वंचित बहुजन आघाडीचे अनंत उमाटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रकाश वलके, माकपच्यावतीने चंद्रभान नाखले, बहुजन समाज पार्टीच्यावतीने मनीष फुसाटे, मोहन राईकवार, अपक्ष रवींद्र कोटंबकर, नंदकिशोर बोरकर, निरज गुजर, चंद्रशेखर मडावी, सचिन पांडुुरंग राऊत, कैलास भोसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात ६७ नामांकनपत्र दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात एकूण ६७ नामांकनपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक २२ नामांकन अर्ज देवळी विधानसभा मतदारसंघात दाखल करण्यात आले आहे. अखेरच्या दिवशी देवळी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आ. रणजित कांबळे तर आर्वी येथून काँग्रेसकडून आ. अमर काळे, हिंगणघाट येथे माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी राकाँकडून तसेच राकाँचे बंडखोर म्हणून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी अर्ज दाखल केले आहे. शिवाय देवळी येथून शिवसेनेच्यावतीने समीर सुरेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला.
वर्धा मतदार संघात एकूण १४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यात भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, वंचित बहुजन आघाडीचे अनंत उमाटे, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रकाश वलके, माकपच्यावतीने चंद्रभान नाखले, बहुजन समाज पार्टीच्यावतीने मनीष फुसाटे, मोहन राईकवार, अपक्ष रवींद्र कोटंबकर, नंदकिशोर बोरकर, निरज गुजर, चंद्रशेखर मडावी, सचिन पांडुुरंग राऊत, कैलास भोसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
आर्वी विधानसभा क्षेत्रातून एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. यात भाजपच्यावतीने माजी आमदार दादाराव केचे, काँग्रेसच्यावतीने विद्यमान आमदार अमर काळे, बसपाच्यावतीने चंद्रशेखर डोंगरे, सुनील रामदास देशमुख, युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने दिलीप पोटफोडे, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रूपचंद टोपले, संभाजी ब्रिगेडच्यावतीने संजय वानखेडे, बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने राहुल पारस तायडे तर अपक्ष म्हणून अविनाश बढीये, माधव देशमुख, विलास कैलुके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
देवळी विधानसभा मतदार संघात एकूण २२ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. यामध्ये काँग्रेसच्यावतीने विद्यमान आमदार रणजित कांबळे, शिवसेनेच्यावतीने समीर सुरेश देशमुख, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सिद्धार्थ डोईफोडे, बहुजन समाज पाटीच्या वतीने मोहन राईकवार, सुरेश नगराळे, बहुजन मुक्ती पाटीच्यावतीने हर्षपाल मेंढे, संभाजी ब्रिगेडच्यावतीने नितीन वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवाय अपक्ष म्हणून भाजपाचे बंडखोर जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, ज्ञानेश्वर निघोट, दिलीप अग्रवाल, उमेश म्हैसकर, किरण पारसे, अजय तिजारे, दिनेश शिरभाते, राजेश सावरकर, चेतन साहू, नाना उर्फ ज्ञानेश्वर ढगे, कपिल गोडघाटे, राजेंद्र बनमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
तर हिंगणघाट विधानसभा मतदार संघात एकूण १९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र सादर केले आहे. यामध्ये भाजपाच्यावतीने विद्यमान आमदार समिर कुणावार, राकाँच्यावतीने माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, शिवसेना बंडखोर म्हणून माजी आमदार तथा माजी मंत्री अशोक शिंदे, राकाँ बंडखोर म्हणून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी, मनसेकडून अतुल वांदिले, बसपच्यावतीने विलास टेंभरे, वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. उमेश वावरे, गोंडवाना गणतंत्र पक्षाकडून दमडू मडावी, लोकजागर पक्षाच्यावतीने मनीष नांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तर अपक्ष म्हणून हेमंत इसनकर, किसन व्यापारी, अश्विन तावाडे, अनिल जवादे, मंदा ठवरे, श्याम इडपवार, मनीष कांबळे, प्रशांत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.