Maharashtra Gram Panchayat Election Results; वर्धा जिल्ह्यात महाविकास आघाडीची जबरदस्त मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 01:28 PM2021-01-18T13:28:52+5:302021-01-18T13:29:12+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results ५० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाले. यात वर्धा जिल्ह्यात कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ५० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाले. यात कॅांग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या हाती असलेल्या अनेक ग्रामपंचायतीवर यावेळी मतदारांनी कॅांग्रेसला कैाल दिला आहे. वर्धा शहरालगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतीवर जेष्ठ सहकार नेते माजी आमदार प्रा.सुरेश देशमुख गटाचे १२ उमेदवार विजयी झालेत. सेलू तालुक्यातील सर्वात मोठ्या हिंगणी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सेलू पंचायत समितीचे सभापती अशोक मुडे गटाचा दारूने पराभव झाला. येथे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र उर्फ राणा रणनवरे यांच्या गटाचे आठ तर राष्ट्रवादी कॅांग्रेस प्रणीत निघडे गटाचे सात उमेदवार विजयी झालेत.
येळाकेळी ग्रामपंचायतीवर आमदार डॅा. पंकज भोयर गटाचे १२ उमेदवार निवडूण आले आहे. आर्वी विधानसभा मतदार संघातील वर्धमनेरी ग्रामपंचायतीवर कॅांग्रेसने झेंडा फडकविला आहे. येथे कॅांग्रेसचे ११ पैकी ९ उमेदवार विजयी झाले आहे. मागील १० वर्षापासून वर्धमनेरी ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता होती. यावेळी येथे कॅांग्रेसचे मामा चैाधरी व नरेंद्र बढिये गटाने जोरदार यश संपादन केले आहे. हिंगणघाट तालुक्यातील लहान वणी, ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॅांग्रेसचे सहा तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. मोझरी शेकापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॅांग्रेसचे ८ तर शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला.
हिंगणघाट तालुक्यातील शिरूड ग्रामपंचायतमध्ये भाजपने ९ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. तर तीन जागांवर कॅांग्रेसविजयी झाली. आष्टी तालुक्यात पोरगव्हाण ग्रामपंचायतीत ६ जागांवर भाजप तर कॅांग्रेस तीन जागांवर विजयी झाली आहे. तसेच थार ग्रामपंचायतमध्ये कॅांग्रेसला ६, भाजपला ३ जागा मिळाल्या. अंतोरा ग्रामपंचायतीवर ९ च्या ९ वही जागा कॅांग्रेसने जिंकल्या आहे. आर्वी तालुक्यातील धनोडी ग्रामपंचायतमध्येही कॅांग्रेसचे सहा सदस्य निवडूण आले आहे. तर भाजपला तीन जागेवर यश मिळाले.