Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 11:34 PM2024-11-02T23:34:35+5:302024-11-02T23:36:41+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी महायुतीमध्ये बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. आता या नेत्यांना अर्ज माघार घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून भाजपाने मोठी तयारी सुरु केली आहे. आता वर्धा येथील आर्वी मतदारसंघातील आमदार दादाराव केचे यांची बंडखोरी थांबवण्यात भाजपाला यश आले आहे. केचे यांची अहमदाबाद येथे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्याशी भेट झाल्यानंतर सकारात्मक चर्चा होऊन उमेदवारी मागे घेत असल्याचे आमदार दादाराव केचे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत जाहीर केले.
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
आज आर्वी येथील भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केचे यांनी उमेदवारी माघारी घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी बोलतावा केचे म्हणाले, १९८३-८४ पासुन भाजपाचे काम करतो आहे. २००९ आणि २०१९ मध्ये आमदार झालो. मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी काम केले. निधी मिळाला, पण आश्वासन देऊनही तिकीट मिळाले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले आणि त्यांच्या आग्रहाने अपक्ष उमेदवारी दाखल केली. कार्यकर्ते कार्यकर्त्यांपासून दूर जाऊ नये आणि पक्षाकरिता उमेदवारी मागे घेत असल्याचे केचे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या वतीने आर्वी विधानसभेत उमेदवारी सुमित वानखेडे यांना दिली आहे, यामुळे आमदार दादाराव केचे नाराज होते. त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू होते,आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी दरम्यान चर्चा झाल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली असून त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आले आहे. ४ नोव्हेंबरला आपला अपक्ष नामांकन अर्ज मागे घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.