‘महात्मा’च्या कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 09:44 PM2019-05-05T21:44:01+5:302019-05-05T21:44:28+5:30
सेलू तालुक्यातील जामनी येथील महात्मा सहकारी साखर कारखान्यातील जवळपास ६५० कर्मचारी मागील १५ वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढत होते. आ. डॉ. पंकज भोयर यांना त्याची माहिती मिळताच त्यांनीही संबंधितांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य बँकेने २ कोटी ८ लाख ६६ हजार रुपयांचे धनादेश कर्मचाऱ्यांना वितरीत केल्याने कर्मचाºयांची समस्या निकाली निघाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू तालुक्यातील जामनी येथील महात्मा सहकारी साखर कारखान्यातील जवळपास ६५० कर्मचारी मागील १५ वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढत होते. आ. डॉ. पंकज भोयर यांना त्याची माहिती मिळताच त्यांनीही संबंधितांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य बँकेने २ कोटी ८ लाख ६६ हजार रुपयांचे धनादेश कर्मचाऱ्यांना वितरीत केल्याने कर्मचाºयांची समस्या निकाली निघाली आहे.
महात्मा सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात आल्याने सन २००४-२००५ मध्ये बंद पडला. साखर कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्ज वाढत गेल्याने कारखाना बँकेने ताब्यात घेतला. तथापि येथील कार्यरत कर्मचारी यांची विविध प्रकारची देणी कारखान्याकडे अडकून पडली. राज्य बँकेने कारखाना लिलावात काढण्याचा निर्णय घेतला. ऊस उत्पादक शेतकºयांचे हित लक्षात घेऊन २००९ मध्ये मे. चिअरफुल अल्टरनेटिव्ह फ्युएल सिस्टीम प्रा.ली.या कंपनीने कारखाना ताब्यात घेतला. बँक व नवीन व्यवस्थापन यांच्या मध्ये झालेल्या करारानूसार बँक फक्त कर्मचारी यांची देणी देईल. इतर देणी देण्याची जबाबदारी कारखाना खरेदीदाराची राहील, अशी अट करण्यात आली; पण बँकेने ठरल्याप्रमाणे कर्मचारीयांची रक्कम देण्याचे टाळले. उलट ११ नोव्हेंबर २०१४ ला कर्मचारी कृती समितीला पीएफ कार्यालयाकडे ३ कोटी रुपये भरण्यात आले, आता आमच्याकडे रक्कम क्षिल्लक नसल्याचे कळवित. राज्य सहकारी बँकेने नकारघंटा दिली. पीडित कर्मचारी यांनी आ. भोयर यांना माहिती देत समस्या समजावून सांगितली. त्यानंतर आ. भोयर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख करीत पाठपुरावा केला. राज्य सहकारी बँक व संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी चार वर्ष सातत्य ठेवले. परिणामी राज्य सहकारी बँकेने ६०० कर्मचाºयांचे २ कोटी ८ लाख ६६ हजार रुपयांचे धनादेश वितरित केले आहे.