महात्मा गांधी आणि विनोबांची आठवण जपणारी छत्री दुर्लक्षित ...

By admin | Published: July 3, 2017 01:41 AM2017-07-03T01:41:06+5:302017-07-03T01:41:06+5:30

पवनार येथे १९४९ मध्ये गांधीजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ धामतिरी पवनार आश्रमासमोर छत्रीचे बांधकाम करण्यात आले.

Mahatma Gandhi and Vinoba's reminiscent of the chhatha neglected ... | महात्मा गांधी आणि विनोबांची आठवण जपणारी छत्री दुर्लक्षित ...

महात्मा गांधी आणि विनोबांची आठवण जपणारी छत्री दुर्लक्षित ...

Next

पवनार येथे १९४९ मध्ये गांधीजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ धामतिरी पवनार आश्रमासमोर छत्रीचे बांधकाम करण्यात आले. त्यावर गांधी-विनोबांचे विचार अंकीत केले आहेत. पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या या छत्रीचे अनेक वर्षांपासून रंगरंगोटीचे व डागडूजीचे काम करण्यात आलेले नाही. काही प्रमाणात पायऱ्या खचत चालल्या असून छत्रीचा संपूर्ण रंग उडत चालला आहे. काही वर्षांपूर्वी आमदार पंकज भोयर यांनी बांधकाम विभागाला छत्रीची रंगरंगोटी व डागडूजी करण्याच्या सूचना दिल्या होत्या; पण निधीअभावी काम रखडलेले दिसते. एकीकडे पर्यटनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना दुसरीकडे ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष केले जात आहे. छत्रीची डागडूजी व रंगरंगोटी करण्याची मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.

Web Title: Mahatma Gandhi and Vinoba's reminiscent of the chhatha neglected ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.