महात्मा गांधी जयंती; जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:02 AM2018-10-02T11:02:44+5:302018-10-02T11:04:45+5:30
जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे सेवाग्राम येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज सकाळी लोकार्पण झाले.
Next
ठळक मुद्देना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जगातील सर्वात मोठ्या चरख्याचे सेवाग्राम येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज सकाळी लोकार्पण झाले. या चरख्याने सूत कातता येते. महात्मा गांधीजींच्या १४९ व्या जयंतीनिमित्त व त्यांच्या जन्मवर्षाच्या १५० वर्षारंभानिमित्त वर्धा-सेवाग्राम मार्गावर हा चरखा हुतात्मा स्मारकासमोर उभारण्यात आला आहे. या ठिकाणी कला शिक्षक आशिष पोहणे यांनी सात मिनिटात बापूंचे चित्र रेखाटले. चरखा परिसरात आलेल्या नागरिकांना चरख्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नव्हता.