महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीला समजणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:42 PM2017-10-02T22:42:04+5:302017-10-02T22:42:20+5:30

गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते.

Mahatma Gandhi's satyagraha movement needs to be understood | महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीला समजणे गरजेचे

महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीला समजणे गरजेचे

Next
ठळक मुद्देमेधा पाटकर : विश्व अहिंसा दिवसानिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते. त्यांच्या सत्याग्रह चळवळीला आपण समजावून घेतले पाहिजे, असे विचार नर्मदा बचाव आंदोलनच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.
विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी गांधी विचार परिषदेचे निदेशक डॉ. भारत महोदय, वक्ता म्हणून मिलिंद बोकील, आश्रम अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते.
आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो’ व ‘खरा तो एकची धर्म’ भजन व प्रार्थना म्हटल्यानंतर सूतमाळ, शाल, पुस्तक व चरखा देत भरत महोदय यांच्या हस्ते मेधा पाटकर व मिलिंद बोकील यांचा सन्मान करण्यात आला.
मेधा पाटकर म्हणाल्या, सत्ता परिवर्तन अहिंसेच्या माध्यमातून झाले पाहिजे. अहिंसेलाच मूल्य माणून आपली विचारधारा बनविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांत दुष्काळ आहे. विकासाच्या नावावर बांधे बनविण्यात आले; पण याचा फायदा मात्र उद्योगपतींना होत आहे. कापूस उत्पादक आत्महत्या करीत असला तरी शेतकºयांपेक्षा धनदांडग्या उद्योगपतींचे हित सांभाळण्यात सरकार धन्यता मानत आहे. केंद्रीयकृत व्यवस्थेतील शोषण थांबवायचे असेल तर अहिंसेशिवाय पर्याय नसल्याचे पाटकर यांनी सांगितले.
मिलिंद बोकील म्हणाले, जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतील मी कार्यकर्ता असून गांधी विचार माझ्यात रूजला. बापूंनी सत्याच्या प्रयोगातून आपल्या चुकांची कबुली दिली. देव दगडात नसून तो सत्यात असल्याचे गांधीजींनी दाखवून दिले. भरत महोदय यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर ‘जय जगत’ या प्रशांत गुजर यांच्या गीताने सांगता झाली.
प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले. संचालन करीत उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला कार्यकर्ता, शाळा महाविद्यालय, संस्था, गांधीवादी आदींसह पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Mahatma Gandhi's satyagraha movement needs to be understood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.