महावितरणची मालमत्ता ५१ कोटींनी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 09:49 PM2018-05-06T21:49:37+5:302018-05-06T21:49:37+5:30

महावितरणकडून नागपूर परिमंडलात सुरु असलेल्या विविध विकास कामामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षात मालमत्तेत सुमारे १७१ कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे. यात वर्धा जिल्ह्यात ५१ कोटी रुपयांनी महावितरणची मालमत्ता वाढली आहे.

 Mahavitaran's assets increased by 51 crores | महावितरणची मालमत्ता ५१ कोटींनी वाढली

महावितरणची मालमत्ता ५१ कोटींनी वाढली

Next
ठळक मुद्देअनेक नवीन योजनांची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महावितरणकडून नागपूर परिमंडलात सुरु असलेल्या विविध विकास कामामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षात मालमत्तेत सुमारे १७१ कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे. यात वर्धा जिल्ह्यात ५१ कोटी रुपयांनी महावितरणची मालमत्ता वाढली आहे.
महावितरणच्या या मालमत्तेत गत आर्थिक वर्षात कार्यरत झालेल्या नवीन उपकेंद्रांचा प्रामुख्याने समावेश आहे. यात उपकेंद्राच्या जमिनीचे मुल्याकंन करण्यात आले नाही. या सोबतच महावितरणकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उच्च आणि लाघू दाब वाहिन्या उभारण्यात आल्या. यासाठी विजचे खांब, विविध जाडीच्या वीज तारा यांचा समावेश आहे.
सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात नागपूर परिमंडलाच्या मालमत्तेत २२ कोटी ५३ लाख रुपयांची वाढ झाली होती. राज्याचे ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने नागपूर परिमंडलात मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाला. हा निधी पायाभूत आराखडा योजना-२ , एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाल ग्रामज्योती योजना, विदर्भ-मराठवाडा विशेष विकास निधी या अंतर्गत उपलब्ध झाला. परिणामी जिल्ह्यात वीज यंत्रणा सक्षमीकरणाची कामे सुरु झाली. यातील १४५ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे सध्या प्रगतीपथावर असून मे २०१८ पर्यंत सदर काम पूर्ण करण्याच्या सूचना आहेत.
मागील आर्थिक वर्षात वर्धा मंडल कार्यालयाच्या कार्यकक्षेत ४ कोटी १५ लाख रुपयांची मालमत्ता वाढली होती. नुकत्याच संपलेल्या २०१७-१८ या आर्थिक वर्षात वर्धा विभागात २१ कोटी रुपये, हिंगणघाट विभाग १६ कोटी ३७ लाख रुपये एवढी वाढ झाली आहे.

Web Title:  Mahavitaran's assets increased by 51 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज