१४ हजार शेतकºयांना महावितरणची संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:36 PM2018-01-05T23:36:01+5:302018-01-05T23:37:07+5:30
शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते. परिणामी, शेतकरी महावितरणचे थकबाकीदार होतात. या शेतकऱ्यांकरिता महावितरणद्वारे कृषी संजीवनी योजना राबविली अयूप नोव्हेंबर २०१७ पर्यंत १४ हजार ७७६ शेतकºयांनी लाभ घेतला आहे.
महावितरणकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा उपलब्ध होतो. पिकांचे ओलित करताना कृषी पंप चालविले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या रकमेची देयके येतात. काही शेतकरी ही रक्कम प्रत्येक महिन्यात अदा करण्याची क्षमता ठेवतात तर काहींना ते शक्य होत नाही. परिणामी, ते वर्षानुवर्षे महावितरणचे देयक अदा करू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर मोठ्या रकमा थकित राहतात. वर्धा जिल्ह्यात २०१७ पर्यंत तब्बल ६३ हजार ५९५ शेतकरी थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांकडे महावितरणचे ९१ कोटी ९२ लाख रुपयांचे देयक थकलेले आहे. शेतकऱ्यांनी ही रक्कम अदा करावी म्हणून महावितरणकडून अनेक योजना राबविल्या जातात; पण पिकांची स्थिती पाहता ती रक्कम अदा करणे शक्य होत नाही. मग, ते शेतकरी इच्छा नसतानाही थकबाकीदार होतात. अशा शेतकऱ्यांकरिता महावितरणकडून कृषी संजीवनी योजना राबविली जाते. २०१७ मध्येही थकबाकीदार शेतकºयांकरिता ही योजना राबविण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत नोंदणी करणे गरजेचे होते. नोंदणी केल्यानंतर थकित देयकाच्या रकमेवरील व्याज माफ करून हप्ते पाडून दिले जातात. शिवाय या योजनेत सहभाग घेतल्यानंतर प्रत्येक तिमाहीत नियमित देयक आणि कृषी संजीवनी योजनेचे हप्ते भरणे अनिवार्य केले आहे.
जिल्ह्यातील १४ हजार ७७६ शेतकºयांनी कृषी संजवनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून थकित असलेल्या देयकाच्या रकमेपोटी पहिला हप्ता म्हणून २ कोटी ३२ लाख रुपये महावितरणला प्राप्त झाले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे म्हणून गावोगावी मेळावे घेण्यात आले. जागृतीसाठी वाहनांद्वारे ग्रामस्थांना माहितीही देण्यात आली. असे असले तरी सर्व शेतकरी या योजनेत सहभागी झाले नाही. आता सदर योजनेची मुदत वाढवून थकबाकीदार शेतकºयांना पुन्हा एक संधी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
अखंडित वीज पुरवठ्यासाठी बिल भरणे गरजेचे
कृषी पंपाकरिता वीज पुरवठा करताना शेतकऱ्यांना थ्री-फेजचा वीज पुरवठा द्यावा लागतो. यात शेतकºयांना अधिक देयक येत असल्याने ती रक्कम अदा करणे शेतकºयांकडून शक्य होत नाही. असे असले तरी अखंडित वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना देयक अदा करणे गरजेचे आहे. यात कृषी संजीवनी योजना शेतकऱ्यांना मदतगार ठरत आहे; पण काहीच शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे उर्वरित थकित देयकांकरिता महावितरणला कठोर पावलेच उचलावी लागणार असल्याचे दिसते.
शेतकºयांनी कृषी संजवनी योजनेचा लाभ घेत थकबाकी अदा करणे गरजेचे होते. या योजनेच्या माध्यमातून हे शक्य झाले असते. जिल्ह्यातील १४ हजार शेतकºयांनी योजनेत सहभाग घेत २.३२ कोटींची देयके अदा केली आहेत. ही योजना शेतकºयांच्याच फायद्यासाठी राबविण्यात आली.
- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.