शहरातील प्रमुख मार्गाला खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:25 PM2019-06-24T21:25:43+5:302019-06-24T21:26:01+5:30

शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गावर पडलेले खोल खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांकरिता जीवघेणे ठरत आहेत. मात्र दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केला आहे.

The main roads in the city are the eclipsed potholes | शहरातील प्रमुख मार्गाला खड्ड्यांचे ग्रहण

शहरातील प्रमुख मार्गाला खड्ड्यांचे ग्रहण

Next
ठळक मुद्देदुरुस्तीकडे डोळेझाक : वाहनचालकांच्या जीविताला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गावर पडलेले खोल खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांकरिता जीवघेणे ठरत आहेत. मात्र दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केला आहे.
प्रमुख मार्गावर राधिका उपाहारगृह परिसरासह अन्य ठिकाणी कित्येक दिवसांपासून खड्डे पडले असून सळाखीही उघड्या पडल्या आहेत. रहदारीकरिता त्या धोक्याच्या ठरत आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. हे खड्डे चुकविताना वाहनचालकांना अपघाताला सामोरे लावे लागणार आहे. असे असताना दुरुस्तीच्या दृष्टीने प्रशासन उदासीन आहे. प्रशासनातील अतिमहत्वाचे लोक या सार्वजनिक रस्त्यावरून कधीच ये-जा करीत नाही की, त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे, असा संतप्त सवाल वाहनचालकांतून केला जात आहे.
मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्याबाबत शासन-प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र कानाडोळा केला जात असल्याचेही पट्टेवार यांनी म्हटले आहे.
शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर पडलेल्या खोल खड्डयांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. शाळा कॉलेज सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने व निष्पाप वाहन चालकांच्या जीवावर उठलेले खोल खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पट्टेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
हे आहेत शहरातील खड्ड्यांचे परिसर
शहरातील केसरीमल कन्या शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आदिती मेडिकल, राधिका उपाहारगृह, लोकमत कार्यालय, आरती चित्रपटगृह परिसर, यादव कॅन्टीन, इंगोले चौक यासह अन्य परिसरात कित्येक दिवसांपासून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे संपूर्ण परिसर वर्दळीचे आहेत. तरीदेखील प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यात चालढकल केली जात आहे. एखादा अपघात झाल्यानंतरच उपाययोजना करायच्या का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

Web Title: The main roads in the city are the eclipsed potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.