स्वस्थ आरोग्यासाठी परिसर हिरवा करा

By Admin | Published: July 2, 2017 01:04 AM2017-07-02T01:04:44+5:302017-07-02T01:04:44+5:30

सर्वांच्या स्वस्थ आरोग्यासाठी झाडांचे महत्त्व आहे. यामुळे प्रत्येक तीन माणसांमागे एक झाड लावून शुद्ध व स्वच्छ हवेसाठी नियोजन करावे.

Make the area green for healthy health | स्वस्थ आरोग्यासाठी परिसर हिरवा करा

स्वस्थ आरोग्यासाठी परिसर हिरवा करा

googlenewsNext

शैलेश नवाल : तीन माणसांमागे एक झाड लावून नियोजन करा
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : सर्वांच्या स्वस्थ आरोग्यासाठी झाडांचे महत्त्व आहे. यामुळे प्रत्येक तीन माणसांमागे एक झाड लावून शुद्ध व स्वच्छ हवेसाठी नियोजन करावे. न.प. परिसरातील खुल्या जागेत हरित पट्टे तयार करून परिसर हिरवागार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
आठवडी बाजार चौकात वृक्ष लागवड सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी नवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, नगराध्यक्ष सुचिता मडावी, पं.स. सभापती विद्या भुजाडे, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, नायब तहसीलदार बाळू भागवत, न.प. पदाधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते बाजार चौकात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन कठडे लावण्यात आले. शहरात १५०० झाडे लावण्याचा संकल्प पालिकेने केला.
शहर स्वच्छतेचा ध्यास घ्या. घनकचरा व्यवस्थापनाला अपडेट करून कचऱ्यावर प्रोसेस करा. अतिक्रमण खपवून घेऊ नका, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले.
संचालन राजेंद्र मसराम यांनी केले तर आभार न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर यांनी केले. न.प. गटनेत्या शोभा तडस, सभापती कल्पना ढोक, सुनीता बकाने, सुनीता ताडाम, नगरसेवक श्याम महाजन, मारोतराव मरघाडे, नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, अब्दुल नईम, मुख्या. उपाध्ये, साखरकर, जीवन बकाणे, भुजाडे, गोमासे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Make the area green for healthy health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.