अॅट्रॉसिटी कायदा कठोर करा
By admin | Published: September 9, 2016 02:24 AM2016-09-09T02:24:11+5:302016-09-09T02:24:11+5:30
देशात व राज्यात अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या घटना दररोज घडत आहेत.
निवेदन : काँग्रेसचा अनुसूचित जाती विभाग
वर्धा : देशात व राज्यात अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या घटना दररोज घडत आहेत. मागासवर्गीय समाजात व अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण आहे. शासनाने मागासवर्गीयांना व अल्पसंख्याकांना सरंक्षण देण्याकरिता अॅट्रॉसिटीचा कायदा कडक करावा व त्याची अमंलबजावणी निपक्षपणे करावी, अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे करण्यात आली.
भारतीय राज्य घटनेने देशातील संपूर्ण लोकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. परंतु काही विध्वसंक वृत्तीचे लोक देशातील संहिष्णूतेच वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न मागील दोन वर्षापासून वाढला आहेत. समाजात दुरावा वाढीस लागलेला आहे. कायद्याची भिती राहिलेली नाही. शासनाची संजय गांधी निराधार योजना अस्तित्वात आहे. पंरतु त्या योजनेअंतर्गत मिळणारी मदत अल्प आहे. करीता शासनाने मिळणारी मदत ६०० रूपये वरून २००० करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. हंसराज बोरकर, अध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग काँग्रेस पक्ष, यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. यावेळी आर्वी तालुका अध्यक्ष मधुकर सवाळे, सेलू अध्यक्ष उमेश नरांजे, आष्टी अध्यक्ष मधुकर सोमकुंवर, कारंजा अध्यक्ष विजय बन्सोड, वायफड सर्कल अध्यक्ष अनिल लामसोगे, प्रशांत निमगडे, पद्माकर इरपाते, मधुकर ठाकरे, गंगाधर तायवाडे, भिमराव शंभरकर, राजेंद्र नाखले व कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)