गांधींचे काँग्रेस विसर्जनाचे स्वप्न साकार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:33 PM2018-11-01T22:33:59+5:302018-11-01T22:34:40+5:30

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांनी काँग्रेस विसर्जित करा, असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसचे विसर्जन करून गांधीजींची इच्छा पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील भारतीय पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

Make Gandhi's dream come true for Congress | गांधींचे काँग्रेस विसर्जनाचे स्वप्न साकार करा

गांधींचे काँग्रेस विसर्जनाचे स्वप्न साकार करा

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आर्वीत भाजप कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांनी काँग्रेस विसर्जित करा, असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसचे विसर्जन करून गांधीजींची इच्छा पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील भारतीय पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्याला खा. रामदास तडस, आमदार डॉ. अनिल सोले, माजी आमदार दादाराव केचे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे ओएसडी सुमित वानखडे, माजी खासदार विजय मुडे उपस्थित होते. या मेळाव्यात माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्कसपुर येथील काँग्रेसचे नेते ग्रामपंचायत सदस्य दिगांबर सोलव, अंतोरा येथील अरविंद केचे, गजानन चाफले, हेमराज डाहे, राजकुमार खरे, भालवाडी येथील उपसरपंच तथा युवा सेना प्रमुख सारंग भोसले, सुसुंन्द्रा येथील बिरसा मुंडा कमेटीचे दिलीप कुसराम, रवींद्र उईके, रंजित युवनाते, संजय युवनाते, सचिन कोक्कडे, आशिष नरपाचे, वनराज परतेती, गोवर्धन आत्राम, प्रमोद मसराम, कानेश्वर इरपाचे, तेजस कुसराम, भीमराव कुसराम, ज्ञानेश्वर कुंभरे यांनी भाजपात प्रवेश घेतला. या सर्वांचे ना. मुनगंटीवार यांनी पक्षात स्वागत केले. याप्रसंगी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, विचार करा...डोळे बंद करा...देशाचे पंतप्रधान कोण होऊ शकेल... पवार साहेब खरेच पंतप्रधान होऊ शकतील... शरद पवार म्हटल्यावर १० सेकंदात गाढ झोप येईल...राहुल गांधी म्हटलं तर तुम्हालाच कसं तरी वाटेल आणि झोपू शकू की नाही असा प्रश्न पडेल. पण, मोदी पंतप्रधान होणार म्हटले तर नव चैतन्य निर्माण होईल.भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेश बकाणे म्हणाले की, आर्वी विधानसभा क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे. विकास हा चार विकास इंजिनामुळे होत आहे. यामध्ये पहिले आणि महत्वाचे इंजिन दादाराव केचे, दुसरे इंजिन सुधीर मुनगंटीवार, तिसरे इंजिन सुमित वानखेडे आणि चौथे इंजिन रामदास तडस हे आहेत. याप्रसंगी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांचा सभापती शांता कसर यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. खासदार रामदास तडस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कधी नव्हे एवढा निधी वर्धा लोकसभा क्षेत्रात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कार्यरत आहेत. आपण सर्व अनुभवत आहोत. माजी आमदार दादाराव केचे यांनी सांगितले की, केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबवित नागरीकांचे जीवनमान उंचावित आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्यासाठी कटीबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Make Gandhi's dream come true for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.