जिल्हा बॅकेच्या संपत्तीचा लिलाव करुन शेतकऱ्यांना पैसा द्यावा

By admin | Published: June 6, 2017 01:09 AM2017-06-06T01:09:49+5:302017-06-06T01:09:49+5:30

जिल्हा बँकेत अनेक शेतकरी व शेतमजुरांची रक्कम अडकली आहे. ही बँक आता ऊभी होणे शक्य नाही...

Make a payment to the farmers by auctioning the property of the district bank | जिल्हा बॅकेच्या संपत्तीचा लिलाव करुन शेतकऱ्यांना पैसा द्यावा

जिल्हा बॅकेच्या संपत्तीचा लिलाव करुन शेतकऱ्यांना पैसा द्यावा

Next

रामदास तडस : मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा बँकेत अनेक शेतकरी व शेतमजुरांची रक्कम अडकली आहे. ही बँक आता ऊभी होणे शक्य नाही यामुळे बँकेची चल व अचल संपत्ती लिलावात काढून प्राप्त रक्कमेतून जनतेला त्यांच्या ठेवी वितरीत कराव्या अशी मागणी खा. रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यकर्त्यांनी दिवाळखोरीत काढली; परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर पक्षपात न करता आपल्या सरकारने वर्धेसह इतरही जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या सहकारी बँकाना मदत करून व्यवहार सुरू केले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे, बहुसंख्य ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांच्या रकमा या बँकेमध्ये ठेवण्यात आल्या होत्या; परंतु बँक दिवाळखोरीत निघाल्याने जनतेचा पैसा बँकेत अडकल्याचा आरोप खा. तडस यांनी केला आहे.

Web Title: Make a payment to the farmers by auctioning the property of the district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.