साने गुरूजी कथामालेस कृतिमाला करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:12 PM2017-12-30T23:12:36+5:302017-12-30T23:14:04+5:30

टी-ट्वेन्टीमध्ये रोहीत शर्माला शेवटी पाठवावे तशी माझी अवस्था झालेली आहे. साने गुरूजीचे निधन झाले आणि माझा जन्म व्हावा, हा योगायोग म्हणावा लागेल. विनोबांनी भूदान चळवळीसाठी सर्व कार्यकर्त्यांना एक वर्ष मागितले.

 Make Sane Guruji's storytelling | साने गुरूजी कथामालेस कृतिमाला करा

साने गुरूजी कथामालेस कृतिमाला करा

Next
ठळक मुद्देअभय बंग : ५१ वे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : टी-ट्वेन्टीमध्ये रोहीत शर्माला शेवटी पाठवावे तशी माझी अवस्था झालेली आहे. साने गुरूजीचे निधन झाले आणि माझा जन्म व्हावा, हा योगायोग म्हणावा लागेल. विनोबांनी भूदान चळवळीसाठी सर्व कार्यकर्त्यांना एक वर्ष मागितले. माझे आई-वडील यात सहभागी झाले आणि आम्ही दोघे भावंडे खानदेशातील एका खेड्यात राहू लागलो. मी सहा वर्षांचा होतो. साने गुरूजींच्या कथेमुळे ती तिथे राहू शकलो, अशी प्रांजळ कबुली देत साने गुरूजींच्या कथामालेला कृतिमाला करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.
सेवाग्राम आश्रम परिसरात साने गुरूजी कथामालेच्या ५१ व्या अधिवेशनाचे उद्घाटन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अवधूत म्हमाणे तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, प्रा. माधव वझे, लाला पाटील, श्यामराव कराळे, के. गांजरे, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, संघटक डॉ. गजानन कोटेवार, कार्यवाहक शाखा वर्धाचे प्रा. राजेंद्र मुंडे, स्वागताध्यक्ष प्रदीप बजाज, सरपंच रोशना जामलेकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. अभय बंग यांनी महात्मा गांधी, सानेगुरूजी व प्रकाश मोहाडीकर यांच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण करून दीप प्रज्वलन केले.
विचार व्यक्त करताना डॉ. बंग पूढे म्हणाले की, श्यामची आई मी अजूनही पूर्ण वाचू शकलो नाही. वाचताना मी इतका भावूक झालो आहे. सेवाग्राम हे तिर्थक्षेत्र असल्याने मंदिरात जाताना तशी शुद्धता पाळली जाते. तशीच स्थिती या ठिकाणची आहे. भारतातील सर्व जागेपेक्षा पवित्र जागा वर्धा परिसरात दिसून येईल. रचनात्मक कार्य, संस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. ऐतिहासिक कार्य करणाºया संस्थांची दखल मात्र कुणी घेत नाही, ही शोकांतिका आहे. लंडनला एका घरात धातुच्या एका पट्टीवर राजा रॉय मोहन रॉय राहिले, असे लिहून होते. मग, वर्धा परिसरात असे का दिसत नाही, असा प्रश्न बंग यांनी उपस्थित केला. गिताईचा जन्म झालेले महिला आश्रमातील घर पाहावे म्हणजे लक्षात येईल. कार्य करताना संघटन व बळ हे प्रेरणा स्त्रोतातून मिळते. साने गुरूजींच्या विचारांचा दिवा सतत तेवत ठेवून अधिक व्यापकता येण्यासाठी कार्य करावे. लहान बालकांत व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. कृतीशील नई तालीम व कथामाला यांची सांगड घालून व्यसन कमी कसे करता येईल, यावर कार्य करावे, असा आशावाद ठेवून गुरुजींचे कार्य आणि विचार अखिल भारतात पोहोचविण्यासाठी बंग यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शिवकुमार यांनीही विचार व्यक्त केले. कार्याध्यक्ष म्हमाणे यांनी दिशा देणारे व कृतीशील विचार या परिसरातून आपण घेऊन जाणार आहोत. कथेमालेतून यावर नक्कीच मांडणी करून बालकांना अधिक कौशल्यशिल, संस्कारित बनविण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.
प्रास्ताविक डॉ. गजानन कोटेवार, भूमिका जयवंत मठकर यांनी केले. परिचय प्रा. राजेंद्र मुंडे यांनी करून दिला. स्वागतपर भाषण प्रदीप बजाज यांनी केले. संचालन सुषमा कोटेवार यांनी केले. स्वागतगीत व पसायदान भैरवी काळे यांनी सादर केले.
स्मरणिका व पुस्तकांचे विमोचन
डॉ. अभय बंग यांच्या हस्ते यशोदा माता स्मृती शताब्दी मातृ स्मृती ग्रंथ या स्मरणिकेचे, ‘असे घडलो आम्ही’ लेखिका मनीषा कानडे आणि भारतीय संस्कृती यावर भाष्य’ या अण्णा जाधव यांच्या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. शिवाय विशेष कार्य करणाºयांचा सत्कारही करण्यात आला.

Web Title:  Make Sane Guruji's storytelling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.