स्वत: सोबत दुसऱ्याचाही मानसमित्र बना
By admin | Published: November 13, 2016 12:47 AM2016-11-13T00:47:15+5:302016-11-13T00:47:15+5:30
माणसाचा मेंदू जेव्हा हॅग होतो तेव्हा अनेक विध्वंसक प्रकार घडतात. नैराश्याचा आजार हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आजार आहे.
हमीद दाभोळकर : मानसिक आरोग्य, समाज अंधश्रद्धेवर व्याख्यान
वर्धा : माणसाचा मेंदू जेव्हा हॅग होतो तेव्हा अनेक विध्वंसक प्रकार घडतात. नैराश्याचा आजार हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आजार आहे. तो आजार घालविण्यासाठी प्रत्येक माणसाने सकारात्मक विचार करून स्वत: सोबतच दुसऱ्यांचा मानसमित्र बनून त्याला आधार द्यावा, असे आवाहनात्मक प्रतिपादन मनोविकार तज्ज्ञ तथा महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोळकर यांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुरूवार १० नोव्हेंबर रोजी अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे आयोजित मानसिक आरोग्य, समाज अंधश्रद्धा या विषयावरील व्याख्यानात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. उल्हास जाजू तर प्रमुख अतिथी म्हणून अनेकान्त स्वाध्याय मंदिरचे सचिव अरूण चवडे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार याची उपस्थिती होती.
डॉ. दाभोळकर पुढे म्हणाले, माणसाचे मन हे मेंदूत असत. जेव्हा मनावर मर्यादेपेक्षा जास्त ताण येतो, तेव्हा नैराश्य येते आणि याचा परिणाम त्याच्या दैनंदिन जीवनावर होतो. यातूनच दरवर्षी भारतात एक लाख मनु्ष्य आपले आयुष्य स्वत:च संपवितात. हे थांबविण्यासाठी बुवा बाबांच्या मागे न लागता तज्ज्ञ मनोविकारांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी संजय भगत, अजय मोहोड, भिमसेन गोटे यांनी प्रबोधनपर गीत सादर केले. संचालन प्रा. अजय सावरकर यांनी केले. प्रास्ताविक गजेंद्र सुरकार यांनी तर आभार सुनील ढाले यांनी मानले. यशस्वीतेकरिता भरत कोकावार, सारीका डेहनकर, हेमंत धोनारकर, अनिल मुर्डीव, राजेंद्र ढोबळे, सुधाकर मिसाळ, मयूर डफळे, आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)