ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले; ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 07:58 AM2024-04-26T07:58:49+5:302024-04-26T07:59:18+5:30
Lok Sabha Election 2024 : अगदी सुरवातीलाच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने येथील मतदान ४० मिनिट खोळंबले.
देवळी (वर्धा): वर्धा लोकसभेचे उमेदवार खासदार रामदास तडस हे परिवारासह देवळी येथील यशवंत कन्या माध्यमिक शाळेच्या १८५ क्रमांकाच्या केंद्रावर सकाळी ७ वाजता मतदान करायला पोहोचले.
अगदी सुरवातीलाच ईव्हीएम मशीन बंद पडल्याने येथील मतदान ४० मिनिट खोळंबले. सकाळी सव्वापाच वाजता संबंधित केंद्रावरील मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार मशीन दुरुस्त करण्यात आले होते.
परंतु मतदान सुरवात झाल्यानंतर सुद्धा ही मशीन नादुरुस्त असल्याने खासदार तडस यांना थांबून राहावे लागले. त्यामुळे मतदारांची रांग लागली होती.४० मिनिटानंतर सुरळीत सुरू झाले.