वर्धा ब्लास्ट; 'उत्तम'च्या एका कामगाराची मालवली प्राणज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 01:26 PM2021-02-14T13:26:59+5:302021-02-14T13:54:28+5:30

Wardha news नजीकच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवार ३ फेब्रुवारीला ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात ३९ मजूर भाजल्या गेले. जखमी कामगारांत अभिषेक भौमिक याचाही समावेश होता. नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अभिषेकची प्राणज्योत मालवली.

Malvali Pranjyot of the best worker 'Abhishek' | वर्धा ब्लास्ट; 'उत्तम'च्या एका कामगाराची मालवली प्राणज्योत

वर्धा ब्लास्ट; 'उत्तम'च्या एका कामगाराची मालवली प्राणज्योत

Next
ठळक मुद्दे बारा दिवसांपासून नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये देत होता मृत्यूशी झुंज

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : नजीकच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवार ३ फेब्रुवारीला ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात ३९ मजूर भाजल्या गेले. जखमी कामगारांत अभिषेक भौमिक याचाही समावेश होता. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास अभिषेकची प्राणज्योत मालवली.
   अभिषेक भौमिक हा मुळचा पश्चिम बंगाल भागातील वर्धमान जिल्ह्यातील रहिवासी आहे. शटडाऊन आणि त्यानंतरच्या मेंटेनन्सच्या कामासाठी भुगाव येथील उत्तम गलवा कंपनी प्रशासनाने काही कुशल कामगारांना पाचारण केले होते. त्यात अभिषेकचाही समावेश होता. कर्तव्य बजावत असताना बुधवार ३ फेब्रुवारीला झालेल्या अपघातात अभिषेकही भाजल्या गेल्याची माहिती मिळाल्यावर अभिषेकचा भाऊ, काका व जावाई यांनी नागपूर येथील ऑरेंजसिटी हॉस्पिटल गाठल्याने तेही मागील काही दिवसांपासून नागपुरात आहेत. मागील १२ दिवसांपासून अभिषेक हा मृत्यूशी झुंज देत असताना रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या १७ कामगारांवर नागपूर येथील ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अवघ्या काही दिवसांपासून आता होता वर्धेत
भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत मेंटेनन्सच्या कामासाठी काही कुशल कामगारांना कंपनी प्रशासनाने पाचारण केले होते. यात अभिषेक भौमिक याचा समावेश हाेता. घटनेच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच अभिषेक हा वर्धा शहरानजीकच्या भुगाव येथे आला होता, असे कंपनीतील सूत्रांनी सांगितले.

अभिषेक भौमिक या कामागाराचा रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास नागपूर येथील ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचे कुटुंबीय रुग्णालयात मागील काही दिवसांपासून होतेच.   अभिषेक हा पश्चिम बंगाल भागातील वर्धमान जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचे पार्थिव त्याच्या मुळगावी नेण्यासाठी कंपनी प्रशासन त्याच्या कुटुंबीयांना नक्कीच मदत करेल.
- आर. के. शर्मा, जनसंपर्क अधिकारी, उत्तम गलवा, स्टील कंपनी, भुगाव.

Web Title: Malvali Pranjyot of the best worker 'Abhishek'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.