मुलबाळ होत नसल्याने सुरु होता छळ; पत्नीच्या जाचास कंटाळून पतीने स्वत:ला जाळून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 02:44 PM2022-02-19T14:44:01+5:302022-02-19T14:52:36+5:30

विवाह होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटूनही मुल बाळ होत नसल्याने पत्नी नुतन ही नेहमी मृतक सचिनला टोचून बोलणे, वाद करण्यासह मानसिक त्रास देत होती.

man burns himself to death over wife's torture in hinganghat | मुलबाळ होत नसल्याने सुरु होता छळ; पत्नीच्या जाचास कंटाळून पतीने स्वत:ला जाळून घेतले

मुलबाळ होत नसल्याने सुरु होता छळ; पत्नीच्या जाचास कंटाळून पतीने स्वत:ला जाळून घेतले

Next
ठळक मुद्देहिंगणघाट येथील घटनेने खळबळ

वर्धा : मुलं बाळ होत नसल्याने पतीला मानसिक त्रास देत छळ केल्याने या दररोजच्या जाचाला कंटाळून पतीने स्वत:च्या शरिरावर पेट्राेल टाकून जाळून घेत आत्महत्या केली. ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ही घटना त्याच्या राहत्या घरी प्रज्ञानगर येथे घडली. याप्रकरणी व्यक्तीच्या आईवडिलांच्या तक्रारीहून १७ फेब्रुवारी रोजी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली.

मृतक सचीन ज्ञानेश्वर भगत (३५) रा. प्रज्ञानगर याचा विवाह पत्नी नुतनसोबत झाला होता. मात्र, विवाह होऊन तब्बल आठ वर्षांचा कालावधी उलटूनही मुल बाळ होत नसल्याने पत्नी नुतन ही नेहमी मृतक सचिनला टोचून बोलणे, वाद करण्यासह मानसिक त्रास देत होती. या तणावातून सचिन भगत याने राहत्या घरी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास सगळे झोपल्याचे पाहून स्वत:च्या अंगावर पेट्राेल टाकून जाळून घेतले. सचिन ८० टक्के जळाल्याने त्याला तत्काळ सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, १७ फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला होता. मात्र, मृतक सचिन भगत याच्या आई वडिलांच्या व भावाच्या बयाणावरुन पत्नी नुतनविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

Web Title: man burns himself to death over wife's torture in hinganghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.