अन् जखमींच्या भेटीला धावून आले होते मनोहर पर्र्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:06 PM2019-03-18T22:06:13+5:302019-03-18T22:07:04+5:30

तारीख ३१ मे २०१६. नेहमीप्रमाणे सूर्यनारायण उगवला आणि पश्चिमेकडे सरकत-सरकत मावळलाही; पण चंद्राच्या प्रकाशात याच दिवशी अचानक एक मोठी घटना देवळी तालुक्यातील पुलगाव भागातील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आवारात घडली. ती रात्र म्हणजे, १९ जवानांसाठी काळरात्रच ठरली. शिवाय या भयावह स्फोटात १९ जवान जखमीही झाले होते.

Manohar Parrikar, who had come to meet the injured, was present | अन् जखमींच्या भेटीला धावून आले होते मनोहर पर्र्रीकर

अन् जखमींच्या भेटीला धावून आले होते मनोहर पर्र्रीकर

Next
ठळक मुद्देकेंद्रीय दारूगोळा भांडारातील ‘ती’ काळरात्र : घटनास्थळाची केली होती पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तारीख ३१ मे २०१६. नेहमीप्रमाणे सूर्यनारायण उगवला आणि पश्चिमेकडे सरकत-सरकत मावळलाही; पण चंद्राच्या प्रकाशात याच दिवशी अचानक एक मोठी घटना देवळी तालुक्यातील पुलगाव भागातील केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आवारात घडली. ती रात्र म्हणजे, १९ जवानांसाठी काळरात्रच ठरली. शिवाय या भयावह स्फोटात १९ जवान जखमीही झाले होते. याच घटनेनंतर तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वर्धा गाठले. त्यांनी पुलगाव येथील घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून दारूगोळा भांडारातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवाय आपल्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमातून काही वेळ काढत जखमी जवानांची सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
पुलगाव येथील केंद्रीय दारू गोळा भंडारात दोन वर्षांपूर्वी अग्निस्फोट झाला होता. या स्फोटात १९ जवान शहीद झाले होते. तसेच १९ जवान जखमी झाले होते. मध्यरात्री घडलेला हा स्फोट इतका भयावह होता की जणू भुकंप आला असेच हादरे परिसरातील गावांना बसले होते. शिवाय आगीचे लोळ देवळी शहरातील उंच इमारतीवरून तेथील अनेक नागरिकांनी बघितले होते. घटनेची माहिती मिळताच काही लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. मध्यरात्री घडलेल्या या घटनेची वार्ता दुसरा दिवस उजाडेपर्यंत वाऱ्यासारखीच परिसरात पसरल्याने सकाळी रुग्णालय व घटनास्थळाच्या आवारात बर्घ्यांची एकच गर्दी झाली होती.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय दारूगोळा भांडारातील अग्निशमन दलाच्या जवानांसह आदींकडून कसोशीचेच प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर सेनेच्या बड्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली होती. या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी झटपट आपल्या दैनंदिन कार्यक्रमातून सवड काढून वर्धा गाठली होती. त्यांनी घटनास्थळाची पाहणी, दारूगोळा भंडारातील अधिकाºयांशी आटोपून जखमींची विचारपूस करण्यासाठी थेट सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय गाठले होते.
त्यावेळी त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जखमींना तत्परतेने मदत पोहचविण्याबाबत तातडीचे निर्णय घेतले होते. शिवाय या घटनेतील शहीद कुटुंबीयांचे सात्वनही त्यांनी केले होते.
त्यांच्या रूपाने त्यावेळी एक तत्पर व निर्णयक्षम संरक्षणमंत्री वर्धेकरांना पहावयास मिळाला. तत्कालीन संरक्षणमंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी अचानक स्वादुपिंडाच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वर्धा जिल्ह्यातील नागरिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Manohar Parrikar, who had come to meet the injured, was present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.