पीक जगविण्यासाठी अनेक प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:37 PM2018-06-16T23:37:55+5:302018-06-16T23:37:55+5:30

सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Many experiments to survive the crop | पीक जगविण्यासाठी अनेक प्रयोग

पीक जगविण्यासाठी अनेक प्रयोग

Next
ठळक मुद्देसिंचनाकडे शेतकऱ्यांची धाव : भारनियमनाने असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून शेतात उगविलेले अंकूर वाचिण्याकरिता सध्या अनेक प्रयोग केले जात आहे. कुठे फवाऱ्याच्या माध्यमातून अंकुरलेल्या पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न होत आहे. तर कुठे मजुरांच्या सहायाने या अंकुरांना पाणी देत जगविण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे.
हिंगणघाट परिसरात गज आठ दिवसांत मोठ्या प्रमाणावर कपाशी लावण झाली. या भाग जवळपास ५० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. आठ दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांनी कापूस व सोयाबीनची पेरणी उकून घेतली. अशा पावसाचा पुढे फायदा होईल अशा आशेने मोठ्या प्रमाणात अर्थात ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. काही सोयाबीनला अंकुरही फुटले, रोपटे बाहेर आले. परंतु आता पाऊस नसल्याने वातावरण तापत आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रोपट्यांच्या वाढीवर परिणाम होत आहे. ज्यांच्या सोयाबीनचे बी-बियाणे अद्याप रोपट्यात रुपांतरीत व्हायचे आहेत त्यांचे बियाणे ही जमिनीत कोरडपणाने गुदमरून मरत आहे. शेतकरी आपले डोळे आभाळाकडे लावून बसले असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
कापसाचे बियाणे लावल्यानंतर अचानकपणे उष्णतेत वाढ झाली आणि दमटपणा वाढला. दोन तीन दिवसात पावसाचे पुनरागमन झाल्यास दुबार पेरणीची परस्थिती टळेल. अन्यथा आर्थिक शेतकºयांना दुबार पेरणीच्या आर्थिक फटक्याची शक्यता आहे.
बळीराजाला निसर्गाचा पहिला झटका
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतकरी आभाळाकडे डोके लावून बसले आहे. पावसाचे पुनरागमन सोडा एक थेंबही पडेल असे चित्र सध्या नसल्याचे दिसत आहे.
पावसाची सुरुवात निर्धारीत वेळेआधी होणार असा अंदाज खरा ठरल्यानंतर पावसाने गत आठवड्यापुर्वी गर्जनेसह आगमन झाले. कुठे कुठे जबरदस्त पाऊसही झाला. यामुळे शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. परंतु आता त्या करपण्याच्या मार्गावर आहे.
शेतकरी मजुरांकडून पिकांना पाणी
नारायणपूर परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मजुरांच्या हाताने कपाशी पिकाला पाणी देत आहे. या माध्यमातून त्यांचा अंकुरलेली पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आहे. असा प्रयत्न करणे शेतकºयांकरिता आर्थिक अडचणीचे ठरत आहे.

Web Title: Many experiments to survive the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती