आॅनलाईन अर्जापासून अनेक शिक्षक वंचित

By Admin | Published: May 23, 2017 01:02 AM2017-05-23T01:02:30+5:302017-05-23T01:02:30+5:30

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत २४ एप्रिल २०१७ रोजी सुधारीत आदेश काढला.

Many teachers disagree with online application | आॅनलाईन अर्जापासून अनेक शिक्षक वंचित

आॅनलाईन अर्जापासून अनेक शिक्षक वंचित

googlenewsNext

आंतरजिल्हा बदली : शिक्षण विभागाची उदासीनता
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत २४ एप्रिल २०१७ रोजी सुधारीत आदेश काढला. या आदेशानुसार राज्यात आंतर जिल्हा बादलीचे अर्ज आॅनलाईन स्वीकारण्याचा निर्णय घेतला. प्रारंभीपासूनच बदल्यांचे पोर्टल धिम्या गतीने असल्याने वेळोवेळी मुदत वाढवून देणे सुरू झाले. नागपूर, अमरावतीसह विदर्भात दिलेल्या वेळापत्रकानुसार पोर्टलच्या कासवगतीमुळे कार्यवाहीच होऊच शकली नाही. त्यामुळे शासनाने १७ ते १९ मे या दिलेल्या मुदतीत अनेक शिक्षकांचे आॅनलाईन अर्ज भरण्यापुर्वी स्टाफ पोर्टलवरील दुरुस्ती झाली नाही. परिणामी, त्यांना बदल्यांपासून वंचित राहावे लागले.
शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर २० व २१ मे अशी दोन दिवस मुदत वाढवून मिळाली. वर्धा जिल्हा परिषदेत जुलै २०१४ मध्ये नियुक्त विषय पदवीधर शिक्षकांच्या नियुक्ती आदेशाची तारीख स्टाफ पोर्टलवर बदलवून मूळ सहायक शिक्षक म्हणून नियुक्ती तारीख दुरुस्त करण्याची सुविधा सरल प्रणालीनुसार केवळ जिल्हा परिषदेच्या मुख्यालयास्थित कार्यालयातच आहे. शनिवारी आंतरजिल्हा बदलीस इच्छुक शिक्षकांना ही अडचण लक्षात येताच त्यांनी मुख्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित आॅपरेटर पुणे येथे जाणार असल्याने त्यांनी दुपारनंतर दुरुस्ती करण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे संबंधित शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने कार्यालय बंद होते. परिणामी स्टाफ पोर्टलवरील तारखेची दुरुस्ती होऊ शकली नाही. रविवारी रात्री अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. जि.प. शिक्षण विभागाने शिक्षकांना येणारी अडचण लक्षात घेत रविवारी कार्यालय सुरु ठेवले असते तर शिक्षकांवर वंचित राहण्याची वेळ आली नसती. मिळालेल्या माहितीनुसार अशा वंचित राहणाऱ्या शिक्षकांची संख्या २५ पेक्षा अधिक आहे.

Web Title: Many teachers disagree with online application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.