वर्धेत मराठा मूक मोर्चा २३ आॅक्टोबरला
By admin | Published: September 29, 2016 12:52 AM2016-09-29T00:52:17+5:302016-09-29T00:52:17+5:30
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ वर्धेतील मूकमोर्चा २३ आॅक्टोबर रोजी निश्चित करण्यात आला.
Next
वर्धा : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ वर्धेतील मूकमोर्चा २३ आॅक्टोबर रोजी निश्चित करण्यात आला. शिव वैभव सभागृहात बुधवारी झालेल्या महाबैठकीत हा निर्णय झाला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. मोर्चा जाती-धर्मांच्या विरद्ध नसून अन्यायाविरूद्ध आत्मसन्मानासाठी असल्याचे जाहीर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरूच होती.