भगवतगीतेचा मराठी सार ‘गीताई मंदिर’
By Admin | Published: October 6, 2014 11:16 PM2014-10-06T23:16:19+5:302014-10-06T23:16:19+5:30
आकाशाचे छत आणि गीताई अंकित असलेल्या शिलांचे सुरक्षा कवच असलेल्या गीताई मंदिराचा मंगळवारी वर्धापन दिन. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी संस्कृतमधील भगवत गितेचे
वर्धा : आकाशाचे छत आणि गीताई अंकित असलेल्या शिलांचे सुरक्षा कवच असलेल्या गीताई मंदिराचा मंगळवारी वर्धापन दिन. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी संस्कृतमधील भगवत गितेचे मराठीत भाषांतर केले. त्याला ‘गीताई’ असे नाव दिले. १८ अध्यायात सामावलेल्या या मराठीतील भगवत गितेला उभ्या शिलांवर अंकित केले आहे. हे या गीताई मंदिराचे आगळे-वेगळे वैशिष्ट्ये आहे. गीताई मंदिर आणि परिसर जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देत आहे. दरवर्षी येथेही देश-विदेशातील असंख्य पर्यटक भेट देऊन हा संदेश जगात पोहचवत आहे.
गीताई मंदिराची उभारणी गाईच्या आकारासारखी करण्यात आली आहे. महात्मा गांधी व त्यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांनी एक कुटी बांधून येथे वास्तव्य केले. त्या कुटीला शांती कुटी म्हणतात. ती कुटी आजही अस्तित्वात आहे. शांती कुटीत विनोबा भावे अनेक दिवस वास्तव्यास होते. याच ठिकाणी गीताई मंदिराची निर्मिती करण्यात आली. विनोबांची गीताई येथे अमर झाली आहे़ गीताई मंदिराला लागूनच विश्वशांतीचा प्रेरक संदेश देणारा शांती स्तूप आहे़ गौतम बुद्धाच्या आकर्षक भावमुदे्रतील मूर्ती विराजमान आहेत़ परिसरात रमणीय बाग आहे़ पुज्य फुजीई गुरुजी यांच्या स्मृतींनाही येथे उजाळा मिळतो.(प्रतिनिधी)