दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बाजार बंद
By admin | Published: September 25, 2016 02:04 AM2016-09-25T02:04:14+5:302016-09-25T02:04:14+5:30
उरी येथील सैनिक छावणीवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी देवळी येथे बाजारपेठ बंद ठेवत सर्वपक्षीय मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्याता आला.
सर्वपक्षीय मोर्चा : नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
देवळी : उरी येथील सैनिक छावणीवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी देवळी येथे बाजारपेठ बंद ठेवत सर्वपक्षीय मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्याता आला. मोर्चेकरांनी तहसीलदार तेजस्विनी जाधव यांना निवेदन देवून समाजमनाच्या भडक भावना विषद करण्यात आल्या. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून रोष व्यक्त करण्यात आला. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून एकीचे प्रदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी शहिदांच्या तैलचित्रासह शहराचे मुख्य रस्त्याने मोर्चा काढून पाकिस्तानच्या विरोधात नारे देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यासोबतच भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, विश्वहिंदू परिषदेचे शहरअध्यक्ष मोहन जोशी, शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश जोशी, न.प. उपाध्यक्ष विजय गोमासे, नगरसेवक कृष्णा शेंडे, कामडी, गोल्डी बग्गा, राजू दुबे, हरीश ओझा, माजी सैनिक संतोष तराळे व आनंदराव पोटदुखे, माजी नगरसेवक श्याम महाजन, ग्राहकमंचचे प्रवीण फटिंग, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पवार, राजेंद्र सावळकर, लालु टावरी, प्रकाश चांभारे, टिनू तंवर, गुड्डु शेख, दिनेश क्षीरसागर, गिरीराज बासू, उमेश तेलरांधे, मुरलीधर तपासे, गजानन धपके, श्याम नासरे, शरद सातपुते तसेच जयहिंद व्यायाम शाळेचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)