Video : वर्ध्यातील भंगार गोदामाला भीषण आग; प्लास्टिकसह लाकूड खाक
By चैतन्य जोशी | Published: June 7, 2023 01:05 PM2023-06-07T13:05:00+5:302023-06-07T13:06:09+5:30
एक कोटीवर नुकसान : अग्निशमक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु
वर्धा : वर्ध्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भंगार गोदामाला सकाळी ८ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत गोदामातील भंगाराचे साहित्य तसेच प्लास्टिक अन काही लाकूड जळून खाक झाले. ही आग इतकी भीषण होती की धुराचे लोळ उठले होते. गोदाम मालकाचे जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
वर्धा औद्योगिक वसाहतीतील डी २०/९ या भूखंडावर वसीमभाई यांच्या मालकीचे भंगार प्लास्टिक व लोखंडी वेस्टचे गोदाम आहे. गोदामात वेस्ट प्लास्टिक पासून प्लास्टीक गॉन्डींग तयार केले जाते. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोदामाला अचानक आग लागली. आणि पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले.
वर्ध्यातील भंगार गोदामाला भीषण आग; प्लास्टिकसह लाकूड खाक #wardha#firepic.twitter.com/IKYpIAZWPA
— Lokmat (@lokmat) June 7, 2023
गोदामातून आगीचे लाेळ उठताच परिसरात खळबळ माजली. अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवळपास १५ फेऱ्या झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.