लॉकडाऊनच्या पार्श्वभूूमीवर भरारी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:23+5:30

या पथकांनी गुरुवारपर्यंत ५५ प्रकरणात ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांची दंडवसुली केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १२ प्रकरणात कारवाई करून ५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे. कोविड १९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगरानी पथकाने कलम १८८ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अंतर्गत ५५ प्रकरणांत ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांचा दंड वसूल केला आहे.

Massive squad action in the wake of lockdown | लॉकडाऊनच्या पार्श्वभूूमीवर भरारी पथकाची कारवाई

लॉकडाऊनच्या पार्श्वभूूमीवर भरारी पथकाची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देशासन निर्देश अवहेलनेची ५५ प्रकरणे : ९ एफआयआर, साडेतीन लाखाची दंड वसुली

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाहा/आर्वी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घराबाहेर पडू नका, घरीच राहा , आरोग्याची काळजी घ्या, असे वारंवार शासनाने आवाहन करूनही नागरिक ऐकत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. मास्क लावत नाही. गर्दी करतात. एवढेच नव्हे, तर लॉकडाऊन असूनही व्यावसायिक दुकाने उघडतात. निर्देशाचे पालन करीत नसल्याने यावर कडक उपाययोजना करून आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी भरारी, निगराणी पथके तयार केली.
या पथकांनी गुरुवारपर्यंत ५५ प्रकरणात ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांची दंडवसुली केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १२ प्रकरणात कारवाई करून ५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे.
कोविड १९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगरानी पथकाने कलम १८८ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अंतर्गत ५५ प्रकरणांत ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांचा दंड वसूल केला आहे. तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी राजापूर बाजारवाडा मिर्झापूर, मायबाई वॉर्ड या परिसरात भेटी देऊन तपासणी केली असता दहा प्रकरणांत १७ हजार ५८० रुपयांचा दंड ठोठवून वसुली केली.
नायब तहसीलदार विनायक मगर यांच्या पथकाने कलम १८८, २६९ साथरोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये, एक, एफआयआर नोंदविली, तीन प्रकरणांत ५७ हजार २०० रुपयांचा दंड तर एका प्रकरणात दोन लाखाचा दंड आकारला. जाम, चांदणी, हरदोली या परिसरात भेट देऊन तपासणी केली.
नायब तहसीलदार व्ही. पी. हूड यांनी वाढोणा परिसरात तपासणी करून एका प्रकरणात २ हजाराचा दंड केला तर एकूण चार प्रकरणात ५४ हजार २०० रुपयाची दंडवसुली केली. विस्तार अधिकारी शेंडे यांनी खरांगणा परिसरातील पाच प्रकरणात २ हजार ५०० रुपयांचा दंड केला. एकूण सोळा प्रकरणात ८ हजारांची दंड वसुली केली. आर्वी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी पाच प्रकरणात ९०० रुपये दंड तर कलम १८८, २६९ साथरोग अधिनियम १८९७ कलम ३ नुसार ८ एफआयआर आणि १३ प्रकरणात २ हजार ३४० रुपयांची दंड वसुली केली.

कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर घरात राहा आणि बाहेर पडणे गरजेचे असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे सांगितले जात आहे. मात्र, अनेक भागात प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी, दंडात्मक कारवाईला सुरवात करण्यात आली आहे.
- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी.

Web Title: Massive squad action in the wake of lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.