मातंग समाजाच्या पुढाऱ्यांना केले स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 09:19 PM2019-03-20T21:19:54+5:302019-03-20T21:20:51+5:30

विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्यावतीने जलसमाधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मातंग समाजाचे पुढारी आणि काही समाजबांधव आंदोलनस्थळी एकत्रही आलेत.

The Matang community leaders have been detained | मातंग समाजाच्या पुढाऱ्यांना केले स्थानबद्ध

मातंग समाजाच्या पुढाऱ्यांना केले स्थानबद्ध

Next
ठळक मुद्देआर्वी पोलिसांनी कारवाई : आंदोलनासाठी झाले होते एकत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : विविध मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्यावतीने जलसमाधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मातंग समाजाचे पुढारी आणि काही समाजबांधव आंदोलनस्थळी एकत्रही आलेत. परंतु, आंदोलनाची माहिती मिळताच आर्वी पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आचारसंहितेचे कारण पुढे करीत आंदोनकर्त्यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केले.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बिंदूसरा प्रकल्पात संजय ताकतोडे यांनी मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी जलसमाधी घेतली. त्यापूर्वी त्यांनी मातंग समाजावर होणारे अन्याय रोखण्यासाठी सरकारने तात्काळ योग्य पाऊल उचलावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील सर्व तांत्रिक अडचनी दूर करून ते सुरु करावे. आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु, त्यानंतरही सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप करीत त्याचा निषेध नोंदविण्यासाठी युवा स्वाभिमानचे दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलनकर्ते एकत्र झाले होते. या आंदोलनाची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच पोलिसांनी झटपट आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध केले. आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील सकल मातंग समाजाच्यावतीने आयोजित या आंदोलदानात आंदोलनकर्त्यांनी आमच्या मागण्या निकाली काढा अन्यथा जलसमाधी घेऊ असा पवित्रा घेतला होता. आंदोलनकर्ते देऊरवाडा येथील नदीवर जाण्याच्या बेतात असताना त्यांना आर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनात दिगंबर सनेसर, बबन गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव सहभागी झाले होते.

Web Title: The Matang community leaders have been detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस