साठे जयंती उत्सवानिमित्त मातंग समाज मेळावा

By admin | Published: September 1, 2016 02:06 AM2016-09-01T02:06:15+5:302016-09-01T02:06:15+5:30

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त मातंग समाज मेळावा पिपरी (मेघे) येथे रविवारी पार पडला.

Matang Samaj Mela celebrates Sathe Jayanti festival | साठे जयंती उत्सवानिमित्त मातंग समाज मेळावा

साठे जयंती उत्सवानिमित्त मातंग समाज मेळावा

Next

वर्धा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त मातंग समाज मेळावा पिपरी (मेघे) येथे रविवारी पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य राणा रणनवरे होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. भास्कर म्हरसाळे, अशोक गायकवाड, अमोल खंडारे, देवेंद्र वानखेडे, डॉ. पवन भांदककर, प्रतिभा झाडे उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव महिनाभर साजरा करण्यात येतो. या मेळाव्याने उत्सवाचा समारोप करण्यात आला. यावेळी राणा रणनवरे यांनी मातंग समाजबांधवांना अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दान केला. यानंतर सानिका व रिंकू ससाने या चिमुकल्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाषण दिले. शामराव खडसे, हिंगणघाट यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे संचालन संजय तिळले यांनी तर आभार प्रतिभा झाडे यांनी मानले.
मेळाव्याचे आयोजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालु गजभिये, सचिव विनायक मुंगले, प्रा. शतानंद पोटफोडे, पंकज सनेसर, कोषाध्यक्ष किसन शिखरे, करण केवटे, तुळशीराम गवळी, पंजाब मुंगले, वैशाली मुंगले यांनी केले. मान्यवरांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. चंद्रकांत तिळले पेन्टर, वनीता गवळी, धनुजी वानखेडे, लता पोटफोडे, पळसराम गवळी, प्रतिक तिळले, परमेश्वर खंडारे, गजानन ससाने, विमल विनायक मुंगले, सोनु मुंगले, रामदास ससाने, दिपाली मुंगले, दुर्गा गवळी, साई मुंगले, मंदा तिळले, बेबी वानखेडे, दुर्गा तिळले यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Matang Samaj Mela celebrates Sathe Jayanti festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.