माऊलीच्या दर्शनासाठी ५० बसेस सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:46 PM2019-07-02T21:46:39+5:302019-07-02T21:47:25+5:30
विठूनामाचा गरज करीत अनेक पालखी-दिंडीत सहभागी होणारे भाविक पंढरपूरपर्यंतचा सुमारे ६०० किमीचा प्रवास पायी करतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य परिवहन महामंडळाचा वर्धा विभाग यंदा तब्बल ५० बसेस सोडणार आहे. या नियोजनाला सध्या अंतिम रूप दिले जात आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विठूनामाचा गरज करीत अनेक पालखी-दिंडीत सहभागी होणारे भाविक पंढरपूरपर्यंतचा सुमारे ६०० किमीचा प्रवास पायी करतात. तर काही भाविक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूर गाठून माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात. माऊलीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुविधा व्हावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य परिवहन महामंडळाचा वर्धा विभाग यंदा तब्बल ५० बसेस सोडणार आहे. या नियोजनाला सध्या अंतिम रूप दिले जात आहे.
वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी आणि तळेगाव या पाच आगारांतील एकूण २७२ बसेसपैकी जास्तीत जास्त २५० बसेसचे योग्य पद्धतीने नियोजन करून त्या वर्धा जिल्ह्यातील विविध भागांसह जिल्ह्याबाहेरही पाठविल्या जातात. तसेच काही बसेस वर्धा होत पंढरपूरच्या दिशेने नेहमीच सोडल्या जातात. परंतु, आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूरला जाणाºया भाविकांची संख्या मोठी राहात असल्याने त्यांना सुविधा व्हावी या दृष्टीने या काळात रापम विशेष बस फेऱ्यांचे नियोजन करते. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा विभागाकडून सुमारे ५० बसेस पंढरपूरला पाठविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. तर मागील वर्षी ही संख्या ४४ च्या घरात होती. तेव्हा बºयापैकी उत्पन्न रापमच्या वर्धा विभागाला झाल्याचे सांगण्यात आले.
प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत घेतली जाणार दक्षता
रापमच्या वर्धा विभागाकडे एकूण २७२ बसेस आहेत. त्यापैकी २५० बसेसचे नियोजन जिल्ह्यातील पाच आगारातून करून त्या बसेस विविध गावांच्या दिशेने पाठविल्या जातात. तब्बल ५० बसेस पंढरपूरला पाठविताना कुठल्याही पद्धतीने विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेत काही बसफेºया रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
६० टक्क्यांवर मिळते भारमान
मागीलवर्षी ४४ बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर यंदा ५० बसेस पंढरपूरला सोडण्याचा मानस रापमच्या वर्धा विभागाचा आहे. त्या दृष्टीने सध्या पाऊलही पडत आहेत. मागीलवर्षी पंढरपूरसाठी सोडण्यात आलेल्या बसेसला ६० टक्क्यांवर भारमान मिळाले होते. तर यंदाही ६० टक्क्यांवर भारमान मिळेल, अशी अपेक्षा रापमच्या अधिकाºयांना आहे.
सूचनांचे पालन न करणाऱ्या वाहक व चालकांवर होणार कारवाई
आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंढरपूरला पाठविण्यात येणाºया बसेसमध्ये वाहक व चालक राहणार आहेत. त्यांनी काय करावे, याबाबतच्या सूचना त्यांना वरिष्ठांकडून पूर्वीच देण्यात येणार आहे. मात्र, रापमचा जो कर्मचारी या सूचनांना पाठ दाखवेल त्याच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
गतवर्षी पाठविल्या ४४ बसेस
आषाढी एकादशीचे औचित्य साधून अनेक भाविक पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी जातात. त्यात वर्धा जिल्ह्यातील भाविकांची संख्याही मोठी आहे. मागीलवर्षी तब्बल ४४ बसेस रापमच्या वर्धा विभागाने भाविकांना सुविधा होईल या हेतूने पंढरपूरला पाठविल्या होत्या.
आषाढी एकादशीनिमित्त मागीलवर्षी ४४ बसेस पंढरपूरला पाठविल्या होत्या. तर यंदा ५० बसेस पाठविण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठीच्या नियोजनाला अंतिम रूप सध्या दिले जात आहे.
- चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, रापम वर्धा.