जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मायेची शिदोरी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:36 AM2018-11-17T00:36:31+5:302018-11-17T00:37:57+5:30

वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा व्हावी या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मायेची शिदोरी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा श्रीगणेशा शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

'Mayech Shidori' initiative at District General Hospital | जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मायेची शिदोरी’ उपक्रम

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मायेची शिदोरी’ उपक्रम

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ : रुग्णांसह नातेवाईकांना आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या जिल्ह्याबाहेरील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुविधा व्हावी या उद्देशाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘मायेची शिदोरी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा श्रीगणेशा शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी, डॉ. अनुपम हिवलेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मायेची शिदोरी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील विविध भागातून तसेच जिल्ह्याबाहेरून येणाºया रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अत्यंत अल्प दरात निवाºयाची व्यवस्थेसह भोजन व अल्पोहाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर उपहारगृह व निवासीगृहाची संचालन जबाबदारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प. वर्धा यांना देण्यात आली आहे. सदरशी जुळून असलेल्या महिला बचत गटाच्या महिला रुग्णांना व रुग्णांच्या कुटुंबियांना मायेची शिदोरी या उपक्रमाच्या माध्यमातून सूविधा देणार आहे. कार्यक्रमाला स्वाती वानखेडे, अमोल भागवत, रजनी शिरभैय्ये, विलास झोटींग यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुविधांचा लाभ घ्या
जिल्हा सामान्य रुग्णालयात मायेची शिदोरी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अतीशय अल्प दरात रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन, अल्पोहार व निवाºयाची सूविधा करून देण्यात आली आहे. गरजुंनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याप्रसंगी सांगितले.

Web Title: 'Mayech Shidori' initiative at District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.