वर्ध्यात 'वापरा आणि परत करा' या धर्तीवर नागरिकांना उपलब्ध होणार वैद्यकीय साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 12:38 AM2021-07-11T00:38:39+5:302021-07-11T00:38:59+5:30
Wardha news मौनावतार अवतार मेहेर बाबांच्या ९६ व्या मौनदिनाचे औचित्य साधून सावंगी (मेघे) येथील ‘मेहेर सेवाभावी संस्थेचा मेहेर मेडिकल सर्व्हिसेस रुग्णोपयोगी उपकरणांचा लोकार्पण मेहेराश्रय सावंगी, मेघे, वर्धा येथे पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मौनावतार अवतार मेहेर बाबांच्या ९६ व्या मौनदिनाचे औचित्य साधून सावंगी (मेघे) येथील ‘मेहेर सेवाभावी संस्थेचा मेहेर मेडिकल सर्व्हिसेस रुग्णोपयोगी उपकरणांचा लोकार्पण मेहेराश्रय सावंगी, मेघे, वर्धा येथे पार पडला. या अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य व मेहेराश्रयचे संस्थापक सुरेश दोड होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सचिन पावडे, सुधीर पांगुळ, उपसरपंच विलास दोड, श्याम भेंडे उपस्थित होते.
मेहेर सेवाभावी संस्थेने विविध रुग्णोपयोगी साहित्य व्हीलचेअर, कुबड्या, स्टॅण्ड, एअर बेड, वॉटर बेड, वॉकिंग स्टीक, वॉकर, शवपेटी, कमोड चेअर आदी साहित्य गरजूंना नि:शुल्क (वापरा व परत करा) या तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.