दौलतपूर (निंबोली) प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:03 AM2018-04-18T00:03:30+5:302018-04-18T00:03:30+5:30
दौलतपूर (निंबोली) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर आ. अमर काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : दौलतपूर (निंबोली) येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर आ. अमर काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निम्न वर्धा प्रकल्प उपविभागीय अभियंता रब्बेवार, उपअभियंता शेख, उपजिल्हाधिकारी भू-संपादन चंद्रभान पराते यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत दौलतपूर (निंबोली) येथे पुनर्वसनातील बांधकामाला टँकरने पाणीपुरवठा करणे, बांधकामाच्या रेतीसाठी एक रेती घाट राखीव ठेवणे, त्याच्या रॉयल्टीवर सवलत देणे, घरकुलाची यादी एकाच वेळी मंजूर करणे, शासकीय पट्टे देणे, बेघर लोकांची यादी मंजूर करून त्यांना पट्टे देणे, घरकूल बांधकामासाठी मिळणारा निधी अपुरा असल्याने वाढीव निधीत ४० हजारांची वाढ करून रक्कम देणे, दौलतपूर येथे सातबारा वर्ग १ चा द्यावा, पुनर्वसन अनुदानाची रक्कम मंजूर झाली असून किमान १६ टक्के व अधिकाधिक ४९ टक्के अशी तफावत असल्याने रक्कम अधिक द्यावी, विस्थापित कुटुंबीयांसाठी वाहतूक खर्च, घरकूल बांधकामासाठी प्रत्येक भूखंड धारकाला १ लाख ५० हजार रुपये भूमिसंपादन अधिनियम २०१३ नुसार द्यावे, शेती वहिवाटीकरिता रस्ते करून देण वा वाहितीस कठीण शेती संपादीत करून २०१३ च्या कायद्यानुसार मोबदला द्यावा, राजीव गांधी घरकूल योजनेंतर्गत घर बांधणीकरिता बँकेकडून कर्ज द्यावे, दवाखाना बांधकामासाठी जागा राखीव असून बांधकाम सुरू करावे. यामुळे लागून असलेल्या वाठोडा (भाईपूर), दौलतपूर (निंबोली), वागदा, पिपरी, अल्लीपूर, धनोडी, माटोडा, बेनोडा या गावांना दिलासा मिळेल. स्मशानभूमी बांधकाम करणे, पुनर्वसनमधील विद्युत पुरवठा डीपी. ओपन स्पेसमध्ये देणे, ट्रस्ट नसलेल्या हनुमान व महादेव मंदिराचे बांधकाम करून द्यावे आदी मुद्यांवर चर्चा झाली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाची प्रत देण्यात आली.
बैठकीला अनिल काळे, संजय काळे, शैलेश काळे, प्रशांत काळे, किशोर काळे, वसंत मुडे, रामदास बन्नगरे, बाबूलाल कुंभरे, विलास देशमुख, राहुल सुपलकार, सागर भनारकर, सुनील खंडारे, अमित काळे, राजू मोहोकार, अश्विन वºहाडे आदी उपस्थित होते.