गवंडी मजदूर युनियनची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:48 PM2017-10-14T23:48:21+5:302017-10-14T23:48:26+5:30
स्थानिक गवंडी बांधकाम मजदूर युनियनच्या सभागृहात स्वतंत्र मजदूर युनियनची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस ज्ञानेश्वर खैरे तर प्रमुख अतिथी म्हणून गौतम पाटील, प्रशांत रामटेके यांची उपस्थिती होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक गवंडी बांधकाम मजदूर युनियनच्या सभागृहात स्वतंत्र मजदूर युनियनची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस ज्ञानेश्वर खैरे तर प्रमुख अतिथी म्हणून गौतम पाटील, प्रशांत रामटेके यांची उपस्थिती होती.
उच्च न्यायालय मुंबईच्या ४ आॅगस्ट २०१७ च्या निकालाने मागासवर्गीय कर्मचाºयांच्या पदोन्नतीतील आरक्षण बंद केल्याने कर्मचाºयांना पदोन्नती मिळणार नाही. एवढेच नव्हे तर १९९२ च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या इंदिरा सहानी वि. भारत सरकारच्या निकालानुसार मागासवर्गीय कर्मचाºयांना १९९७ च्या मुळपदावर पदावनत करण्यात येवून अत्यंत अपमानजनक स्थितीला सामोरे जावे लागेल अशी वेळ येवून ठेपलेली आहे. त्याचप्रमाणे अन्य आरक्षणावर सुद्धा गदा येण्याची भीती यावेळी मार्गदर्शन करताना खैरे यांनी व्यक्त केली.
पदोन्नतीतील आरक्षण नाकारणे हे एक षडयंत्र असून ते हाणून पाडण्यासाठी आरक्षण परिषद यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान प्रशांत रामटेके, गौतम पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. संचालन दयानंद हाडके यांनी केले तर आभार दीपक नगराळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन ओरके, राहुल हाडके, नजीर शेख, भानुदास थूल, नाना झिलपे, किशोर देशमुख, यशवंत मानेश्वर, चिंटु दुबे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाºयांनी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली.