नाना विषयांच्या कवितांनी गाजले संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:51 PM2018-09-03T22:51:02+5:302018-09-03T22:51:25+5:30
संकल्प साहित्य परिषदेच्यावतीने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अॅड. मनोहर फुलमाळी यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन घेण्यात आले. प्रमुख अतिथी वसंतराव करोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संकल्प साहित्य परिषदेच्यावतीने कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अॅड. मनोहर फुलमाळी यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन घेण्यात आले. प्रमुख अतिथी वसंतराव करोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रथम पुष्प रामदास भोमले यांच्या काव्य गायनाने गुंफले तर स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्यांच्या आठवणींना उजाळा देत भालचंद्र डंभेच्या ओळी, ‘गेल कोणाचवं कुंकु, गेली मायची गा कुस, कुठ हरवला भाऊ पोरं मुकले बापास’ अशा शब्दांत बलिदान केलेल्याचे स्मरण करून दिले. तर अॅड. फुलमाळी यांनी ‘हम सब इस देश के वासी, सबका है यह हिंदुस्थान’ अशा धारदास शब्दांत आपल्या देशाची महती गायली. त्यानंतर स्वातंत्र्य देशात कामगाराचे प्रश्न, गर्दीवद्री दरी धुंडून रायलो आम्ही, नोका देवू पुरी अर्धिच मागून रायलो आम्ही, ही संजय भगतची कविता विचार करण्यास प्रवृत्त करून गेली. अॅड. भाष्कर नेवारे यांची गोंदन कविता ‘ प्रा. मनोहर चिचपाणे पुर्वीचा काळ’ या कविता सादर झाल्यात.
डॉ. भीमराव भोयर यांची माझ्या गावाच वैभव तर वामनराव लांडगे यांचे सत्य बोलने सोडू नको’ या वैभवशाली कवितांनी बहारदार रंग चढविला. वसंतराव करोडें यांची उलंगवाडी पावसाला साकडे घालत होती. कमलेश पाटील यांनी कलंक कवितेने देशातील दंगलीचा, विजय भगत यांची शिकारी तर मोरेश्वर सहारे यांचे स्वातंत्र्य तू जन्मलात तेव्हा या कवितेने देशातील घडामोडींना जनतेसमोर आणले. या प्रश्नांचा समोराकरीत स्त्री असावी अशी या सुषमा ढाले यांनी स्त्री शक्तीची जाणीव करून दिली. प्रा. प्रमोद नारायणे यांनी स्वातंत्र्याला प्रश्न विचारला तर सुरेश सत्यकार यांनी ‘इस देश की रक्षा करलो, जहा टिके रहे आझादी’ असा मोलाचा सल्ला दिला. प्रा. अशोक गावंडे यांनी वंदन या कवितेतून या देशाला, मातृभूमीका व समस्त नागरिकांना वंदन केले.