वर-वधुला पुस्तक देत दिला ‘वाचाल तर वाचाल’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:50 PM2018-07-16T22:50:53+5:302018-07-16T22:51:13+5:30
तालुक्यातील पढेगाव येथे ग्रा.पं. चे उपसरपंच नरेंद्र पहाडे यांच्या पुढाकाराने ग्रा. पं. च्या प्रांगणामध्ये गरीब कुटूंबातील वधु- वरांचे पुस्तक भेट देत लग्न लावून देण्यात आले. या लग्न सोहळ्यात पारंपारीक रुढींना फाटा देत पैशाची बचत करण्यात आली. इतकेच नव्हे तर सदर लग्न सोहळा ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश देणाराच ठरल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : तालुक्यातील पढेगाव येथे ग्रा.पं. चे उपसरपंच नरेंद्र पहाडे यांच्या पुढाकाराने ग्रा. पं. च्या प्रांगणामध्ये गरीब कुटूंबातील वधु- वरांचे पुस्तक भेट देत लग्न लावून देण्यात आले. या लग्न सोहळ्यात पारंपारीक रुढींना फाटा देत पैशाची बचत करण्यात आली. इतकेच नव्हे तर सदर लग्न सोहळा ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश देणाराच ठरल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
येथील शुभम सुधाकर पोटफोडे व अर्चना शंकर गायकवाड रा. कसारखेड (हिंगणगाव) येथील मुलगी ही दोन्ही कुटूंब अत्यंत गरीब असल्यामुळे लग्न सोहळ्याचा खर्च या दोन्ही कुटूंबांना न परवडनाराच होता. दरम्यान दोन्ही कुटूंबियांनी पहाडे यांची मदत घेत विचारपूस केली असता सदर कुटूंबांना योग्य मार्गदर्शन करून अत्यल्प खर्चात वधु-वरांचे लग्न लावून देण्यात आले. सदर लग्न सोहळा पढेगावच्या ग्रा. पं. कार्यालयाच्या आवारात पार पडला. नवदाम्पत्याला पुस्तक भेट देवून पुढील वाटचालीसाठी उपस्थित वरिष्ठांनी आर्शीवाद दिले. यावेळी वधु व वर पक्षाकडील कुटुंबियांनी रुढी व परंपारांना फाटा देत केवळ ऐरवी होणारा लग्नावरील मोठा खर्च टाळला. केवळी वधु-वरांनी एकमेकांना माल्यार्पण करून पुष्पगुच्छ दिले. पुस्तकाचे महत्त्व ओळखून ते भेट देण्यात आले.