कीर्तनातून दिला समतेचा संदेश
By admin | Published: October 26, 2015 02:12 AM2015-10-26T02:12:46+5:302015-10-26T02:12:46+5:30
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)
प्रबोधन : सामाजिक उपक्रम
वर्धा : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या समतादूत प्रकल्पांतर्गत मातोश्री वृद्धाश्रम, सिंदी (मेघे) येथे भजन, कीर्तन, गीतगायन कार्यक्रम घेण्यात आला. या माध्यमातून समतेचा संदेश देऊन प्रबोधन करण्यात आले.
सामाजिक सौख्य राखण्याकरिता अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन हा कार्यक्रम घेतला. वैज्ञानिक प्रयोगातून प्रबोधन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पमाला देशमुख होत्या तर प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी डोंगरे, प्रकल्प अधिकारी अनिता तेलंग मंचावर उपस्थित होत्या.
यावेळी भजन, बासुरी वादन करण्यात आले. कार्यक्रमाला समतादूत सिद्धार्थ सोनकुंवर, विक्की बिजवार, बंशी परतेती, विनायक भांगे, स्वप्नील चवरे, रसिका वाघमारे, विशाखा पोराटे, अनिता दाठे, रुपाली ठाकरे,नंदा प्रजापती, जरीन पठाण, प्रिया ठाकरे, शीतल मोरे आदींनी सहकार्य केले. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी गीत सादर केले.(स्थानिक प्रतिनिधी)