तंटामुक्त समित्या ठरताहेत मिनी न्यायालय
By admin | Published: October 9, 2014 11:06 PM2014-10-09T23:06:52+5:302014-10-09T23:06:52+5:30
महात्मा गांधीनी भगवतगितेतील सत्य आणि अहिंसा या दोन शब्दाच्या शक्तीवर भारताला स्वांतत्र्य मिळवून दिले. शांततेतून समृद्रीकडे नेण्याचा मंत्र देणाऱ्या महात्मा गांधी तंटामूक्त गाव मोहिमेमुळे
धनराज हुलके - वडनेर
महात्मा गांधीनी भगवतगितेतील सत्य आणि अहिंसा या दोन शब्दाच्या शक्तीवर भारताला स्वांतत्र्य मिळवून दिले. शांततेतून समृद्रीकडे नेण्याचा मंत्र देणाऱ्या महात्मा गांधी तंटामूक्त गाव मोहिमेमुळे न्यायालयाचा भार हलका झाला असून या समितीच्या पूढाकारातून ग्रामीण भागातील नागरिकांचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी फौजदारी व महसूली तंट्याचा निपटारा करण्यात येत आहे. राज्यात अलीकडील चार वर्षांत तब्बल आठ लाख ११ हजार ४१९ फौजदारी तर ३३ हजार ३९९ महसुली तंटे मिटविण्यात या समित्यांना यश आल्याचे राज्याच्या गृह विभागाने एका अहवालात जाहीर केले आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू झाली. त्यानंतर ही मोहीम राज्यात एक चळवळ म्हणून उदयास आली आहे. पैसा व वेळेची बचत करू शकणाऱ्या या तंटामूक्त गाव मोहिमेचे सर्वानीच स्वागत केले असून मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे. गावा-गावात तंटामुक्त गाव समित्या स्थापन करून गावातील तंटे गावातच समोपचाराने सोडविण्याचे कार्य या समितीच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस ठाण्याच्या चकरा मारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या उपक्रमामुळे शासनाकडून या समित्यांचा गौरव केला जात आहे.