कृषी राज्यमंत्र्यांनी केली नुकसान पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:07 AM2019-08-17T00:07:09+5:302019-08-17T00:07:54+5:30
कृषी तथा फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी पढेगाव येथे नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत दुर्गे व गणेश हिंगे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : कृषी तथा फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी पढेगाव येथे नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत दुर्गे व गणेश हिंगे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
येथील ग्रामपंचायतीत सहाय्यक कृषी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कृषी कार्यालयाचे उद्घाटन ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले.
जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशनच्या वतीने नदी, नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरण करण्यात आले व याचा शेतकऱ्यांना कितपत लाभ होत आहे, याची पाहणी करून शेतकºयांशी त्यांनी संवाद साधला. शेतीला पुरक जोडधंदा निर्माण केल्याशिवाय शेती परवडणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, उपविभागीय कृषी अधिकारी अजयकुमार राऊत, बजाज फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक राजू पवार, तालुका कृषी अधिकारी पी.ए. घायतीडक, सरपंच अनंता हटवार, कृषी सहाय्यक एस.एस. ढुमणे, तलाठी तळवेकर, उपसरपंच गोपाल दुधाने उपस्थित होते. जि.प. शाळेचे मुख्याध्यापिका तुपकर, बजाज फाऊंडेशनचे विनोद पारीसे, सर्व महिला बचत गट सदस्य व शिक्षक गण ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व संत वसंत बाबा युवा क्रीडा मंडळ यांनी सहकार्य केले.